ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दोन वॉण्टेड गुन्हेगारांना अटक

शोध निबंध प्रसिद्धीसाठी लेफ्टनंट कर्नलला गंडा घातल्याची कबुली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 नोव्हेंबर 2025
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दोन वॉण्टेड गुन्हेगारांना अटक करण्यात अंधेरी पोलिसांना यश आले आहे. राजू शेट्टी आणि सुरेश म्हाडेकर अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. या दोघांवर शोध निबंध प्रसिद्धीसाठी भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट कर्नलला 1 लाख 28 हजारांना गंडा घातल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होताच गेल्या चार महिन्यांपासून ते दोघेही फरार होते, मात्र या दोघांनाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

ओमकार विलास सावंत हे अंधेरीतील चकाला, तरुण-भारत सोसायटीच्या साईकृपा अपार्टमेंटमध्ये राहतात. सध्या ते भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल म्हणून कामाला असून त्यांची पोस्टिंग दिल्ली येथे आहे. ते आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या विषयावर पीएचडी करत आहेत. त्यासाठी त्यांनी काही शोध निबंध लिहिले होते, ते शोध निबंध त्यांना रिसर्च पेपर जर्नलमध्ये प्रसिद्ध करायचे होते. त्यामुळे त्यांनी गुगलवर सर्च करुन रिसर्च पेपर जर्नलचा एक मोबाईल क्रमांक शोधला होता. या मोबाईलवर संपर्क साधून त्यांनी त्यांचे शोध निबंध प्रसिद्ध करण्याबाबत चर्चा केली होती.

यावेळी समोरील व्यक्तीने त्यांचे पीएचडीचे शोध तीन निबंध प्रसिद्ध करण्यासाठी 69 हजार आणि 59 रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यामुळे त्यांना आधी पेमेंट करावे लागतील असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला आगाऊ 34 हजार रुपये आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा 34 हजार रुपये पाठविले होते. पेमेंट प्राप्त होताच त्याने त्यांना तीन महिन्यांत शोध निबंध प्रसिद्ध होईल असे सांगितले. 30 नोव्हेंबर 2024 रोजी त्याने त्यांना दुसरे निबंध पाठविले होते. त्यासाठी त्यांनी त्याला 59 रुपयांचे पेमेंट केले होते.

मात्र महिन्यांत निबंध प्रसिद्ध न झाल्याने त्यांनी त्याला पुन्हा कॉल करुन विचारणा केली होती. यावेळी त्याने त्यांना टाळण्याचा प्रयत्न करुन पुढच्या महिन्यांत प्रसिद्ध होईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी रिसर्च पेपर जर्नलच्या मेल आयडीवर तक्रार केली होती. या मेलनंतर त्यांना संबंधित कार्यालयातून त्यांनी आर्थिक व्यवहार केलेली बोगस वेबसाईट आहे. त्यांना पाठविण्यात आलेले संपादक जेम्स आर लुईस यांच्या सहीचे बोगस अ‍ॅक्सेपटन्स प्रमाणपत्रही बोगस आहे. अशा प्रकारे तीन शोध निंबंध प्रसिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडून 1 लाख 28 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली होती.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अंधेरी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अंधेरी पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.

तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी राजू आणि सुरेश या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page