शारीरिक संबंधास प्रवृत्त करुन अल्पवयीन मुलाचे अपहरण
19 वर्षांच्या तरुणीविरुद्ध अपहरणासह पोक्सोचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 फेब्रुवारी 2026
मुंबई, – एकतर्फी प्रेमातून एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला लैगिंक अत्याचारासह प्रवृत्त करुन लग्नास नकार दिला म्हणून त्याचे तिने अपहरण केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकणी पिडीत मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 19 वर्षांच्या आरोपी तरुणीविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी अपहरणासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत अद्याप तिच्यावर अटकेची कारवाई झाली नसून तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
17 वर्षांचा पिडीत अल्पवयीन मुलगा हा मानखुर्द परिसरात राहत असून तो सध्या काहीच कामधंदा करत नाही. सानिया ही 19 वर्षांची तरुणी त्याच्या परिचित असून तीदेखील याच परिसरात राहते. त्यामुळे त्यांची मैत्री होती. तिचे त्याच्यावर एकतर्फी प्रेम होते. याच प्रेमातून गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांत तिने त्याला तिच्या मानखुर्द येथील राहत्या घरी आणले होते. घरी आणल्यानंतर तिने त्याच्याशी जवळीक निर्माण करुन त्याला तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार करण्यास प्रवृत्त केले होते. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकीच तिने त्याला दिली होती.
भीतीपोटी त्याने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्याचाच तिने फायदा घेतला होता. ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत तिने त्याला अनेकदा घरात कोणीही नसताना तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले होते. तसेच त्याच्याशी लग्नाची मागणी करत करत होती. त्याने नकार दिल्यास ती स्वतला दुखापत करुन घेईल अशी धमकी देत होती. तो नकार देत असल्याने तिने त्याचे अपहरण केले होते.
तिच्या तावडीतून सुटका केल्यांनतर त्याने घडलेला प्रकार त्याच्या कुटुंबियांना सांगितला होता. त्यानंतर मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी तरुणीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत सानिया या तरुणीविरुद्ध अपहरणासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. बुधवारी उघडकीस आलेल्या या प्रकाराने स्थानिक रहिवाशांना प्रचंड धक्का बसला होता.