प्रॉपटीच्या वादासह पत्नीशी लग्न केले म्हणून भावाला चाकूने भोसकले

हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपी भावाला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2026
मुंबई, – गावाकडील वडिलोपार्जित प्रॉपटीच्या वादासह पत्नीशी दुसरा विवाह केला म्हणून मोठ्या भावाला लहान भावाने चाकूने भोसकल्याची घटना दहिसर परिसरात घडली. या हल्ल्यात राजकिशोर फुलचंद कामत हा 41 वर्षांचा भाऊ गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला प्रगती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेला आरोपी भाऊ मुकेश फुलचंद कामत याला दहिसर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना शनिवारी 28 मार्चला रात्री साडेअकरा वाजता दहिसर येथील न्यू लिंक रोड, संभाजीनगर, कालिमाता मंदिराजवळ घडली. राजकिशोर कामत हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून त्याची पत्नी पार्वती आणि दोन मुलांसोबत विरार येथील फुलपवाडा रोड, श्री साई अपार्टमेंटमध्ये राहतो. सध्या तो प्रगती हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून करतो. त्याच्या लग्नाला अकरा वर्ष पूर्ण झाली असून त्याची पत्नी पार्वती हिचे त्याचा लहान भाऊ मुकेश कामतसोबत विवाह झाला होता. त्याची पहिली पत्नी बबिता ही चौदा वर्षांच्या मुलासोबत त्याच्या बिहार येथील गावी राहते. पार्वतीसोबत लग्न केल्यानंतर राजकिशोर आणि मुकेश यांच्यात वाद सुरु होता. या वादानंतर त्यांच्यात पटत नव्हते, ते दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते.

काही दिवसांपासून त्याचे दोन भाऊ मुकेश आणि रुपेश हे त्याला गावच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये काहीच हिस्सा देणार नाही असे सांगत होते. या प्रॉपटीवरुन त्यांच्यात नव्याने वाद सुरु झाला होता. शनिवारी 28 मार्चला तो त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत त्याच्या दहिसर येथील मिनीनगरात राहणार्‍या सासू-सासर्‍यांना भेटण्यासाठी आला होता. यावेळी त्यांना त्याचे भावोजी संतोष कामत यांचा कॉल केला होता. त्याने मुकेश हा गावाहून मुंबईत आला असून तो त्याच्या प्रॉपटीवरुन वाद घालत आहे असे सांगितले. त्यामुळे राजकिशोर हा मुकेशला भेटण्यासाठी संभाजीनगर, कालिमाता मंदिराजवळ आला होता.

यावेळी राजकिशोरला पाहताच त्याने त्याच्या पत्नीची लग्न केल्याचा तसेच प्रॉपटीवरुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही कळण्यापूर्वीच त्याने त्याच्या खिशातून चाकू काढून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याला पोटासह कमरेला गंभीर दुखापत झाली होती. राजकिशोर हा रक्तबंबाळ होताच घाबरलेला मुकेश तेथून पळून गेला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी राजकिशोरला तातडीने दहिसर येथील प्रगती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे.

ही माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी राजकिशोरची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर हा प्रकार उघडकीस आले होते. त्याने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुकेश कामत याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या मुकेशला काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page