बोगस पासवर रेल्वे प्रवास करणार्‍या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

नवीन पास घ्यायचा नव्हता म्हणून बोगस पास बनविला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2026
मुंबई, – ठाणे-विक्रोळी असा जनरल डब्ब्याचा तीन महिन्यांचा बोगस पास तयार करुन रेल्वे प्रवास करणार्‍या ऋषी अरविंद गोरी या 22 वर्षांच्या तरुणाविरुद्ध कुर्ला रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या ऋषी गोरीला नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले. नवीन पाससाठी पैसे खर्च करायचे नव्हते म्हणून त्याने बोगस पास बनविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस संभाजी यादव यांनी दुजोरा दिला आहे.

हर्षद सुभाष वाडेकर हे दादर येथे राहत असून भारतीय रेल्वेत तिकिट तपासनीस म्हणून काम करतात. बुधवारी 1 एप्रिलला सकाळी अकरा वाजता ते विक्रोळी रेल्वे स्थानकात प्रवाशांचे तिकिट आणि पासची तपासणी करत होते. यावेळी त्याने एका तरुणाकडे तिकिट-पासची मागणी केली. त्याने त्यांना रेल्वेचा पासदाखविला होता. पाहणीदरम्यान तो पास घाटकोपर-ठाणे असा तीन महिन्यांच्या जनरल डब्ब्याचा होता. पासचा युएफव्ही कमांक आठ अंकी असतो, मात्र या तरुणाने दाखविलेल्या पासचा युएफव्ही क्रमांक नऊ अंकी होता. तो पास बोगस असल्याचा संशय वाटल्याने त्यांनी पासचा फोटो काढून त्यांच्या टिसी व्हॉटअप ग्रुपमध्ये शेअर केला होता.

यावेळी त्यांचे सहकारी संतोष सावंत यांनी संबंधित रेल्वे पास बोगस असल्याचे सांगितले. त्यानंतर विक्रोळी रेल्वे स्थानकात उपस्थित पोलिसांच्या मदतीने त्यांनी या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेऊन कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात आले. चौकशीदरम्यान त्याचे नाव ऋषी गोरी असल्याचे उघडकीस आले. तो घाटकोपर येथील वीर संभाजी रोड, चिरागनगर, दामजी शामजी चाळीत राहत असून विक्रोळीतील एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. त्याला बोगस पास कोठून बनवून दिला याबाबत विचारणा केली असता त्याने तो पास त्याचा मित्र शुभम याने दिल्याचे सांगितले.

मात्र शुभम नावाच्या मित्राचा या संपूर्ण प्रकरणात काहीही संबंध नसल्याचे उघडकीस आले. त्याचा रेल्वे पास 22 मार्चला संपला होता. त्यामुळे 23 मार्चला त्याने स्वतच बोगस पास ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले तेव्हापासून तो या बोगस पासवर घाटकोपर-विक्रोळी असा प्रवास करत होता. तपासात ही माहिती उघड होताच त्याच्याविरुद्ध बोगस रेल्वे पास बाळगून प्रवास करुन रेल्वेची फसवणुक केल्याप्रकरणी ऋषीविरुद्ध फसणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page