दहा वेगवेगळ्या कारवाईत दहा कोटीचा ड्रग्जचा साठा जप्त

ड्रग्जच्या गुन्ह्यांत दहा आरोपींवर अटकेची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2026
मुंबई, – दहा वेगवेगळ्या कारवाईत सुमारे दहा कोटीचा विविध ड्रग्जचा साठा मुंबई पोलिसांनी अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. याच गुन्ह्यांत दहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी 902 ग्रॅम वजनाचे एमडी, 20 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 7 किलो 690 हायड्रोपोनिक गांजाचा समावेश आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत दहा कोटी चौदा लाख रुपये इतकी किंमत आहे. 1 एप्रिल ते 7 एप्रिल या कालावधीत कांदिवली, वरळी, आझाद मैदान, घाटकोपर अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगतले. अटकेनंतर दहाही आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.

गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना कांदिवली, वरळी, आझाद मैदान आणि घाटकोपर युनिटच्या अधिकार्‍यांनी वडाळा येथील बीपीटी रोड, अंधेरीतील विरा देसाई रोड, वडाळा टी टी, वांद्रे येथील भारतनगर, विलेपार्ले येथील फिरोजशहा मेहता रोड, माहीम रेल्वे स्थानक, मालाडच्या मालवणी, नागपाडा, धारावी आणि गोरेगाव परिसरात कारवाई केली होती.

या कारवाईत ड्रग्जची विक्रीसाठी आलेल्या दहा आरोपींना अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी 902 ग्रॅम वजनाचे एमडी, 20 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 7 किलो 690 हायड्रोपोनिक गांजा असा 29 किलो 292 ग्रॅम वजनाचे विविध ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 10 कोटी 14 लाख 46 हजार 100 रुपये इतकी आहे.

1 एप्रिलला वरळी युनिटने वडाळा येथून एका आरोपीकडून 218 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज तर 6 एप्रिलला अन्य एका तरुणाला अटक करुन त्याच्याकडून 7 किलो 690 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या एमडी आणि गांजाची अनुक्रमे किंमत 54 लाख 50 हजार तर 7 कोटी 69 लाख रुपये इतकी आहे. दुसर्‍या कारवाईत 2 एप्रिलला आझाद मैदान युनिटने एका तरुणाला 20 किलो 700 ग्रॅम वजनाच्या गांजासह अटक केली. त्याची किंमत 6 लाख 21 हजार आहे.

अशाच अन्य एका कारवाईत या पथकाने 35 लाख 10 हजार रुपयांच्या 117 ग्रॅम वजनाच्या एमडीसह तरुणाला अटक केली. गोरेगाव, धारावी, अंधेरी आणि माहीम या पाच वेगवेगळ्या कारवाईत कांदिवली युनिटने पाच आरोपींना अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी 281 ग्रॅम वजनाचे एमडी डग्ज जप्त केले होते. त्याची किंमत 76 लाख 25 हजार रुपये इतकी किंमत आहे.

3 एप्रिलला वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांनी वांद्रे येथील भारतनगर परिसरातून एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 48 लाख 90 हजार रुपयांचा 163 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. घाटकोपर युनिटने 7 एप्रिलला मालाडच्या मालवणी परिसरातून अन्य एका तरुणाला अटक करुन त्याच्याकडून 30 लाख 50 हजार रुपयांचा 123 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. अटक केलेल्या दहाही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात होते. यावेळी कोर्टाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page