दागिने बनविण्यासाठी दिलेल्या तीन कोटीच्या शुद्ध सोन्याचा अपहार

अपहारासह फसवणकीप्रकरणी ज्वेलर्स व्यापार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 एप्रिल 2026
मुंबई, – सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या सुमारे तीन कोटीचा 2903 ग्रॅम वजनाच्या शुद्ध सोन्याचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्‍याची फसवणुक झाल्याचा प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी खोकन समशुल शेख या एम ज्वेल्स शॉपच्या मालकाविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. खोकने अशाच प्रकारे इतर काही ज्वेलस्र व्यापार्‍यांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे.

अक्षय जयंतीलाल शहा हे ज्वेलर्स व्यापारी सून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत चिराबाजार, जेएसएस रोड, मुन मेंशन अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची रेरो इंटरनॅशनल सी झेड ज्वेलरी नावाची एक खाजगी कंपनी आहे. याच कंपनीत त्यांच्यासोबत विवेक शहा, आयुष सुशांत शहा, प्रियांका शहा आणि आयुष शहा हे संचालक म्हणून काम करतात. या कंपनीचे शॉपसह कार्यालय धनजी स्ट्रिट, डायमंड प्लाझाच्या चौदाव्या मजल्यावर आहे. खोकन शेख हा त्यांच्या परिचित व्यापारी आहे. तो मुंब्रा येथील आनंद कोळीवाडा, समाधान अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याची एम ज्वेल्स नावाचे सोन्याचे दागिने बनविण्याचा एक कारखाना आहे.

काळबादेवी परिसरात त्याचा कारखाना असून तिथेच तो इतर कारागिराच्या मदतीने दागिने बनविण्याचे काम करतो. या चार वर्षांत त्यांनी खोकनकडून अनेकदा विविध डिझाईनचे सोन्याचे दागिने बनवून घेतले होते. त्यासाठी त्याला कॅश स्वरुपात मोबदला दिला जात होता. दागिने बनविण्यसाठी खोकन हा त्यांच्या शॉपमध्ये येत असायचा. त्यांच्याकडून शुद्ध सोने घेतल्यानंतर दिलेल्या मुदतीत सोन्याचे दागिने बनवून देत होता. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा विश्वास होता.

एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत त्यांनी टप्याटप्याने 3 कोटी 9 लाख 85 हजार रुपयांचे 2903 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना सोन्याचे दागिने बनवून दिले नाही किंवा दागिने बनविण्यासाठी शुद्ध दागिने परत केले नव्हती. वारंवार विचारणा करुनही तो वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र एक वर्ष उलटूनही त्याने सोन्याचे दागिने बनवून दिले नाही. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार एल. टी मार्ग पोलिसांना सांगून खोकनविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सोन्याचे दागिने बनविण्यासाठी घेतलेल्या 3 कोटी 9 लाखांच्या 2903 ग्रॅम शुद्ध सोन्याचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page