गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्जप्रकरणी मुख्य पुरवठादारास अटक

म्युझिक कॉर्न्स्टमध्ये ड्रग्ज पुरविल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 एप्रिल 2026
मुंबई, – गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील ड्रग्जप्रकरणी मुख्य ड्रग्ज पुरवठादार आयुष विकी साहित्य नावाच्या एका आरोपीस वनराई पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अटक झालेला आयुष हा नववा आरोपी आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांनाही शनिवारी दुपारी कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी रौनक राहुल खंडेलवाल, आकाश बनमारी सामल, सनी विनोद जैन, बालकृष्णन बलराम कुरुप, प्रतिक बिजेश पांडे या पाचजणांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी तर विनित सुजीत गेरेलानी आणि शुभ रामलखन अग्रवाल या दोघांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये एका लाईव्ह कॉर्न्स्टमध्ये मद्यासह ड्रग्जचे सेवन केल्यानंतर दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता तर एका तरुणीवर उपचार सुरु आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून आयुष साहित्यचे नाव समोर आले होते. मात्र या आरोपींच्या अटकेनंतर तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला शुक्रवारी उल्हासनगर येथून पोलिसांनी अटक केली.

त्याच्यावर म्युझिक कॉर्न्स्टमध्ये विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरविल्याचा आरोप आहे. 24 वर्षांचा आयुष हा आनंद पटेलच्या संपर्कात होता. त्याला तो ड्रग्ज पुरवत होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला शनिवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांतील इतर सात आरोपींना शनिवारी पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने कोर्टात हजर करण्यात आले होते.

यावेळी त्यापैकी पाचजणांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्या आली तर इतर दोघांची 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या गुन्ह्यांत गेल्या चार दिवसांत पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असून त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींची नावे समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page