लग्नाच्या आमिषाने लैगिंक अत्याचार करुन महिलेची फसवणुक

महानगरपालिकेच्या के/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्ताला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 एप्रिल 2026
मुंबई, – लग्नाच्या आमिषाने लैगिंक अत्याचार करुन एका महिलेची फसवणुक केल्याचा आरोप असलेल्या महानगरपालिकेच्या के/पूर्व विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त नितीन शुक्ला यांना पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांत नितीन शुक्ला यांच्या अटकेने पालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

यातील तक्रारदार महिला विक्रोळीतील बांधकाम प्रस्ताव विभागात कामाला असून तिथेच नितीन हे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. कामानिमित्त भेट होत असल्याने त्यांची ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तिच्याशी त्यांनी जवळीक साधून तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. नितीन हे विवाहीत होते, मात्र त्यांनी पत्नीपासून विभक्त होण्याचा विचार असल्याचे सांगून तिच्यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रचंड तणाव आहे. पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर तो तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. याच दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते.

सर्व काही सुरळीत सुरु असताना तिने त्यांच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता, मात्र नितीन तिला लग्नाचा विषय निघताच टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने लग्नाबाबत ठाम भूमिका केली होती. तरीही त्यांनी तिच्याशी लग्न केले नाही. केवळ शारीरिक संबंधासाठी नितीनने लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने पार्कसाईट पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नितीन शुक्लाविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्यांना पोलिसांनी अटक केली.

त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. नितीन शुक्ला हे पूर्वी एफ-उत्तर विभागात वॉर्ड अधिकारी म्हणून कार्यरत होते. नंतर त्यांना के-पूर्व विभागाच्या पालिका सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यातआला होता. सध्या ते तिथे पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्याविरुद्ध लैगिंक अत्याचाराचा दाखल झालेला गुन्हा आणि या गुन्ह्यांत त्यांना अटक झाल्याने त्याची वरिष्ठ पालिका अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरु असून या चौकशीनंतर त्यांच्यावर पालिकाकडून योग्य ती कारवाई होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page