महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला 21 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई शहरात पाच पोलीस उपायुक्तांची बदली

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2026
मुंबई, – महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गृहविभागाने राज्य पोलीस दलातील 21 आयपीएस अधिकार्‍यांची बदल्या केल्या आहेत. त्यात मुंबई शहरात पाच पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. या सर्व पोलीस अधिकार्‍यांनी तातडीने त्यांच्या नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या जागी पदभार घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून काही आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश प्रतिक्षेत होते. मे महिन्यांत बदल्या अपेक्षित असताना 30 एप्रिलला सायंकाळी उशिरा गृहविभागचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी राज्य पोलीस दलातील 21 पोलीस अधिक्षक-पोलीस उपायुक्त पदाच्या अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहेत. त्यात इतर शहरातून पाच पोलीस अधिक्षकांना मुंबई शहरात पाठविण्यात आले आहे. इतर पोलीस अधिकार्‍यांमध्ये जालनाचे पोलीस अधिक्षक अजय के बन्सल यांची महाराष्ट्र राज्याच्या सायबर सुरक्षा विभागात, अमरावती ग्रामीणचे पोलीस अधिक सिगुरी विशाल आनंद यांची धुळे, अहिल्यानंतरचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची पोलीस महासंचालक कार्यालयातील सहाय्यक पोलीस महानिरीक्षक, नंदूरबारचे पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांची अप्पर पोलीस महासंचालक आणि सहाय्यक पोलीस महानिरीक्षक आस्थापना, चंदपूरच्या पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगर, ठाणे ग्रामीणचे धोडोंपत एस. स्वामी यांची नाशिक ग्रामीण, वाशिमचे पोलीस अधिक्षक अनुज मिलिंद तारे यांची पुणे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे लोहमार्ग विभागाचे पोलीस अधिक्षक अश्विनी सानप यांची नंदूरबार, मालेगावचे पोलीस अधिक्षक तेगबीर सिंह संधू यांची जालना, पुण्याचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची पुणे लोहमार्ग, पुणे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे यांची वाशिम, जालनाचे पोलीस अधिक्षक आयुष नोपानी यांची चंदपूर, अमरावती ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांची परभणी, नागपूर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांची अमरावती ग्रामीण, परभणीचे अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुंजाल यांची मालेगाव आणि अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती विभागाचे दत्ता लक्ष्मण तोटेवाड यांची अमरावती येथे पोलीस अधिक्षक म्हणून बदली दाखविण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे फोर्स वनचे पोलीस अधिक्षक गजानन राजमाने, नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधिक्षक अनुराग जैन, राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप घुगे, परभणीचे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह एस. परदेशी, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबई शहरात बदली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page