पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्याकडून अत्याचार

पिडीत मुलीची बालसुधारगृहात रवानगी तर सावत्र पित्याला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2026
मुंबई, – घरात कोणीही नसल्याची संधी साधून पंधरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच सावत्र पित्याने आठ दिवसांपासून लैगिंक अत्याचार केल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून 28 वर्षांच्या आरोपी सावत्र पित्याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पिडीत मुलीला कांदिवलीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले असून तिची लवकरच मेडीकल होणार आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना गुरुवारी उघडकीस आल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

35 वर्षांची तक्रारदार महिला ही बोरिवली परिसरात राहत असून आरोपी हा तिचा प्रियकर तर पिडीत ही तिची पंधरा वर्षांची मुलगी आहे. ती सफाई कर्मचारी तर तिचा पती डिलीव्हरी बॉय म्हणून कामाला आहे. 21 एप्रिलला ही महिला तिच्या कामासाठी निघून गेली होती. यावेळी तिची मुलगी एकटीच घरी होती. याच दरम्यान आरोपी घरी आला आणि त्याने पिडीत मुलीसमोरच कपडे काढून तिच्याशी जवळीक साधण्यचा प्रयत्न केला. तिचे कपडे काढून त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता.

21 एप्रिल ते 28 एप्रिल 2026 या कालावधीत त्याने अनेकदा घरात कोणीही नसल्याची संधी साधून पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार केला होता. 28 एप्रिलला आरोपी घरातून निघून गेला होता, यावेळी पिडीत मुलगी रडत होती. त्यामुळे तिच्या आईने तिची आपलुकीने चौकशी केली होती. यावेळी तिने ती कामावर गेल्यानंतर आरोपी लवकरच घरी येतो आणि तिच्यावर लैगिंक अत्याचार करत असल्याचे सांगितले. गेल्या आठ दिवसांपासून हा प्रकार सुरु असून त्याच्याकडून होणार्‍या मानसिक व शारीरिक शोषणाला ती कंटाळून गेली आहे.

मुलीकडून हा प्रकार समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने तिच्यासोबत कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा प्रियकर आणि सावत्र पित्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page