हेव्ही डिपॉझिटच्या पैशांचा अपहार करुन चालकाची फसवणुक

आरोपींकडून इतर पाचजणांची 22.80 लाखांची फसवणुक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 एप्रिल 2026
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देतो असे सांगून असे सांगून एका चालकाकडून घेतलेल्या पाच लाखांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार शिवडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी करीम फकीर ठाकूर या इस्टेट एजंटविरुद्ध रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. करीम ठाकूर याने तक्रारदारासह इतर पाचजणांकडून एकाच फ्लॅटसाठी हेव्ही डिपॉझिट म्हणून 22 लाख 80 हजार रुपये घेतले होते. त्यापैकी कोणालाही फ्लॅटचा ताबा किंवा हेव्ही डिपॉझिटची रक्कम परत करता त्यांची फसवणुक केली होती.

राजू कृष्णा नायडू हे शिवडी परिसरात राहत असून चालक म्हणून काम करतात. त्यांना हेव्ही डिपॉझिटवर एक फ्लॅट हवा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांची इस्टेट एजंट असलेल्या करीम ठाकूरशी ओळख झाली होती. त्याने त्यांना शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे उद्यान, सखाराम लांजेकर मार्गावर अधिग्रहित नावाची एक इमारत असून या इमारतीमध्ये रुम क्रमांक सहा हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा आहे. एप्रिल 2025 रोजी त्यांनी फ्लॅटची पाहणी केली. फ्लॅट पसंद पडल्याने त्यांनी त्याला आधी दोन लाख आणि दोन महिन्यानंतर तीन लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्याने त्यांना काही दिवसांत फ्लॅटचा ताबा देण्याचे मान्य केले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. तो वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. याच दरम्यान त्यांना करीम ठाकूरने अशाच प्रकारे इतर काही लोकांना हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देतो असे सांगून त्यांच्याकडून हेव्ही डिपॉझिट म्हणून पैसे घेतले होते. त्यात नाझिम पटेल यांच्याकडून साडेपाच लाख, कुरेशी फारुखभाई इब्राहिम यांच्याकडून चार लाख, सोहेल शेख यांच्याकडून चार लाख तीस हजार, मोहम्मद मुक्तार अली यांच्याकडून चार लाख, फेहमिदा ताहिद यारकर हिच्याकडून पाच लाख असे 22 लाख 80 हजार रुपये घेतले होते. मात्र त्यापैकी कोणालाही फ्लॅटचा ताबा दिला नव्हता.

या पाचजणांशी फ्लॅटशी व्यवहार केला असता त्याने त्यांच्यासोबत अशाच प्रकारे व्यवहार करुन त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते. मात्र फ्लॅटचा ताबा दिला तसेच हेव्ही डिपॉझिट म्हणून घेतलेली रक्कम परत केली नव्हती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच राजू नायडू यांनी करीम ठाकूरविरुद्ध रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात तथ्य असल्याचे आढळून येताच करीम ठाकूरविरुद्ध पोलिसांनी हेव्ही डिपॉझिटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page