मुंबई क्राईम रिपोर्टर्स असोशिएशनच्या अध्यक्षपदी विशाल सिंग

सर्वेश तिवारी उपाध्यक्ष, ब्रिजभान जैस्वार सरचिटणीस तर पूनम अपराज खजिनदार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 मे 2026
मुंबई, – मुंबई क्राईम रिपोर्टर्स असोशिएशनची निवडणुक शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्तलयात शांततेत पार पडली. या निवडणुकीत विशाल सिंह हे तिसर्‍यांदा अध्यक्ष म्हणून निवडून आले. सर्वेश तिवारी उपाध्यक्ष, ब्रिजभाल जैस्वार सरचिटणीस, पूनम अपराज खजिनदार तर सचिन गाड हे सहचिटणीसपदी निवडून आले. विशाल सिंह यांच्या पॅनेलने प्रतिस्पर्धी पॅनेलच्या उमेदवारांचा पराभव करुन बारापैकी दहा सदस्य निवडून आणले. निवडून आलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकारणी सभासदांवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

शुक्रवारी 15 मे 2026 रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयता मुंबई क्राईम रिपोर्टर्स असोशिएशनची निवडणुक झाली होती. सायंकाळी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी विशाल सिंह यांना 83 तर सुरज ओझा यांना 40 मते मिळाले. 43 जास्त मते मिळाल्याने विशाल सिंह यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदासाठी सर्वेशकुमार 64 मते मिळाली तर त्यांचा प्रतिस्पर्धी मनिष पाठक यांना 60 मते मिळाली. त्यामुळे सर्वेशकुमार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

सरचिटणीस म्हणून बृजभान जैसावार, खजिनदार म्हणून पूनम अपराज तर सहचिटणीसपदी सचिन गाड यांची नियुक्ती झाली. ब्रिजभान यांना 79 तर सुरज सावंत यांना 44 मते मिळाली तर सचिन गाड यांना 81 तर अनिस पाटील यांना 41 मते मिळाली. पूनम अपराजने पारस दामा यांचा 30 मतांनी पराभव केला. कार्यकारणी सदस्य म्हणून अशिष सिंग (69), शाहिद अन्सारी (69), अवधूत खराडे (59), दिवाकर सिंग (59), ज्योत्सना गांगणे (82), यशा कोटक (76) यांची निवड झाली.

यावेळी मुख्य निवडणुक अधिकारी म्हणून डॉ. मयुर पारिख आणि सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणून सुधाकर काश्यप यांनी कामकाज पाहिले. त्यांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली झालेल्या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत विशाल सिंह यांची बहुमतांनी तिसर्‍यांदा अध्यक्ष म्हणून निवड झाली हे विशेष. त्यांनी सलग तीन वेळा अध्यक्ष होण्याचा मान मिळविला आहे. निवडून आलेल्या सर्व पदाधिकार्‍यांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page