ओसी नसलेल्या इमारतीच्या एकोणीस फ्लॅटची विक्री करुन फसवणुक

साडेअकरा कोटीच्या फसणुकीप्रकरणी व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 मे 2026
मुंबई, – वांद्रे येथील निर्मलनगर परिसरातील विशाल आशियाना इमारतीला ओसी नसतानाा इमारतीमधील एकोणीस फ्लॅटची परस्पर विक्री करुन सुमारे साडेअकरा कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी व्यावसायिक पार्टनरविरुद्ध निर्मलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वामन रामचंद्र माड्ये असे या व्यावसायिकाचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याची लवकरच पोलिसाकडून चौकशी होणार आहे. या गुन्ह्यांचा तपास निर्मलनगर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

बसंतराज मेघराज सेठीया हे 61 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार बिल्डर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले परिसरात राहतात. त्यांची सेठीया इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून कांदिवलीतील पोईसर परिसरात त्यांच्या कंपनीचे कार्यालय आहे. वामन माड्ये हा बिल्डर त्यांच्या परिचित असून त्याची राजहंस बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स नावाची एक कंपनी आहे. या कंपनीचा वामन माड्ये हा मालक असून त्याच्या मालकीचे वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात एक जागा होती. या जागेवर त्याच्या कंपनीने एसआरएतंर्गत विशाल आशियाना नावाच्या एका इमारतीचे बांधकाम सुरु केला होता.

2010 साली त्याने बसंतराज सेठीया यांच्यासोबत संयुक्तपणे इमारतीचे बांधकामाचा करार केला होता. त्यासाठी त्यांच्यात मेसर्च स्वराज असोशिएट्स या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. याबाबत त्यांच्यात एमओयू झाला होता. ही इमारत विकसित करण्यासाठी लागणारे खर्च त्यांच्या कंपनीने करण्यात येणार होता. या प्रोजेक्टमध्ये बसंतराज सेठीया यांना 70 तेर वामन माड्ये यांना 30 टकके हिस्सा ठरविण्यात आला होता. करारात इमारतीच्या फ्लॅटच्या विक्रीचे सर्व अधिकारी त्यांच्याकडे देण्यात आले होते. त्यांच्या परवानगीशिवाय वामन माड्ये यांना त्यांच्या हिस्साची फ्लॅट विकता येणार नव्हते. तरीही वामन माड्ये यांनी विशाल आशियाना इमारतीमधील 19 फ्लॅटची परस्पर विक्री केली होती.

फ्लॅटच्या विक्रीतून आलेली सुमारे साडेअकरा कोटीचे पेमेंट स्वराज असोशिएट्स कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता त्याच्या मालकीच्या राजहंस बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी वामन माड्ये यांनी विक्री केलेल्या फ्लॅटची माहिती सहदुय्यम निंबंधक कार्यालयातून प्राप्त केली होती. त्यात त्यांना एकोणीसपैकी सोळा फ्लॅटचा तपशील मिळून आला तर इतर तीन फ्लॅटचा माहिती समजली नव्हती. चौकशीदरम्यान वामन माड्ये या फ्लॅटची परस्पर स्वस्तात विक्री करुन बसंतराज सेठीया यांची फसवणुक केली होती.

2010 पासून आतापर्यत वामन माड्ये याने बसंतराज सेठीया यांच्यासोबत एमओयू आणि पार्टनरशीप डिट करण्यापूर्वीच विशाल आशियाना इमारतीमधील एकोणीस फ्लॅटची विक्री करुन त्याची माहिती जाणूनबुजून लपवून ठेवली. या फ्लॅटची विक्री करण्याचा अधिकारी स्वराज असोशिएट्स कंपनीच्या वतीने मॅनेजिंग पार्टनर म्हणून बसंतराज सेठीया यांच्याकडे होता. त्यांना विश्वासघात न घेता फ्लॅटची विक्री करुन 11 कोटी 51 लाख 73 हजार 850 रुपयांची फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच बसंतराज सेठीया यांनी त्यांचे व्यावासायिक पार्टनर वामन माड्ये याच्याविरुद्ध निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर वामन माड्ये याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

आतापर्यतच्या चौकशीत या इमारतीला पाच मजल्यापर्यत परवानगी असताना सात मजली इमारत बनविण्यात आली होती. या इमारतीला ओसी नव्हती. तरीही एका फ्लॅटची दोन ते तीन व्यक्तींना विक्री झाली होती. अशा प्रकारे आतापर्यंत एकोणीस फ्लॅटची विक्री झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page