राज्य पोलीस दलातील 38 आयपीएस अधिकार्‍यांची बदली

सात विशेष महानिरीक्षक, चार अतिरिक्त आयुक्त तर 27 उपायुक्तांचा समावेश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 मे 2026
मुंबई, – राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्याचे सत्र सुरुच असून गुरुवारी गृहविभागाने राज्यातील अन्य 38 आयपीएस अधिकार्‍यांची बदली केली. त्यात सात विशेष पोलीस महानिरीक्षक, चार अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह सत्तावीस पोलीस उपायुक्त-अधिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. एका पोलीस अधिक्षकाला अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या काही आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्याचे सुरु आहे. अलीकडेच राज्यातील काही पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्याचे जारी झाले होते. या बदल्यानंतर गुरुवारी गृहविभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी राज्य पोलीस दलातील 38 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यानंतर नवीन नियुक्तीचे आदेश जारी केले आहे. बदली झालेल्यांमध्ये सात विशेष पोलीस महानिरीक्षकांचा समावेश आहे. नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पडवळ यांची दादर येथील व्हीआयपी सुरक्षा, प्रतिक्षाधीन असलेल्या शारदा राऊत यांची महिला अत्याचार प्रतिबंध विभाग, दादरच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांची नाशिक, अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांची राज्याच्या नियोजन आणि समन्वय विभाग, नक्षल विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नागपूर, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे विशेष पोलीस महानिरीक्षक पंजाबराव उगले यांची ठाण्याच्या सहपोलीस आयुक्त, राज्याच्या नियोजन आणि समन्वय विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील यांची अमरावती येथे बदली करण्यात आली आहे.

अन्य बदल्यांमध्ये पाच अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यात नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजी राठोड यांची ठाणे, पुणे दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे यांची नवी मुंबई, बदलीच्या प्रतिक्षेत असलेले विनिता साहू यांची मुंबई राज्य राखीव पोलीस बदलाच्या पोलीस उपमहानिरीक्षक, या जागी असलेले पोलीस उपमहानिरीक्षक अशोक दुधे यांची ठाणे, बिनतारी संदेश विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आर राजा यांची मुंबई बिनतारी संदेश विभागात बदली दाखविण्यात आली आहे. यावेळी आर राजा यांना बढती देऊन त्यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये ठाण्याचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची राज्य पोलीस निरीक्षक कक्ष, पुण्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक्षक संभाजी कदम यांची पुणे दहशतवाद विरोधी पथक, नाशिकचे पोलीस अकादमीचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची मुंबई, पोलीस उपायुकत विवेक पाटील यांची पुणे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची ठाणे तर शिवाजी पवार यांची पुणे महामार्ग सुरक्षा पथक, ठाण्याचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांची नवी मुंबई डायल 112 विभाग, पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त संजय सरगौडा पाटील, पीएमआरडीए दक्षता अधिकारी अमोल झेंडे यांची मिरा-भाईंदर-वसई-विरार, अमरावतीचे पोलीस उपायुक्त दिपक गिर्र्‍हे यांची नाशिक गुन्हे अन्वेषण विभाग, मिरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख व प्रिती टिपरे यांची अनुक्रमे पिंपरी-चिंचवड व मुंबई अन्न व औषध प्रशासनच्या सहआयुक्त, राज्य पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस उपायुक्त समीर शेख यांची बीड, मुंबईचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांची पुणे अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, सागरी सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त रमेश चोपडे यांची दौंड, नानवीज-पोलीस प्रशिक्षण केंद्र, बदलीच्या प्रतिक्षेत असलेले पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांची मुंबई, नवी मुंबईतील बिनतारी सागर विभागाचे पोलीस उपायुक्त निलेश सोनावणे यांची ठाणे, डायल 112 विभागाचे पोलीस उपायुक्त तानाजी चिखले यांची परभणी येथे बदली करण्यात आली आहे.

अन्य अकरा पोलीस उपायुक्तांच्याही बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यात बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या पोलीस उपायुक्त शीला साईल यांची मुंबई तर प्रकाश जाधव यांची संभाजीनगर ग्रामीण, मुंबईचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांची ठाणे, ठाण्याचे पोलीस उपायुक्त एस. एस बुरसे यांची राज्य गुप्तवार्ता विभाग तर श्रीकांत परोपकारी यांची सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र परदेशी यांची पुण्याच्या राज्य राखीव पोलीस बल क्रमांक एकचे समादेशक, नागपूरचे पोलीस उपायुक्त कुमार चिंथा यांची नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक विनय राठोड यांची ठाणे ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. या सर्व अधिकार्‍यांना त्यांच्या नव्याने नियुक्त केलेल्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page