रॉबरीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस 19 वर्षांनी अटक

जामिनावर कारागृहातून बाहेर येताच पळून गेला होता

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 मे 2026
मुंबई, – रॉबरीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस 19 वर्षांनी खार पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अनिल हवासिंग शोधा असे या 40 वर्षांच्या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले आहे. जामिनावर कारागृहात बाहेर आल्यानंतर अनिल हा खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. तो पळून गेल्याचे उघडकीस येताच त्याला कोर्टाने फरार आरोपी घोषित केले होते. अखेर 19 वर्षांनी त्याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अनिल शोधा हा वांद्रे येथील बीकेसी परिसरात राहत होता. 2007 साली त्याच्याविरुद्ध खार पोलीस ठाण्यात रॉबरीच्या एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. याच गुन्ह्यांत त्याच्यासह त्याच्या सहकारी मित्रांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड कारागृहात होता. काही दिवसांनी त्याच्या वतीने त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला नंतर विशेष सेशन कोर्टाने जामिन मंजूर केला होता. जामिन मिळताच तो कारागृहातून बाहेर आला होता.

मात्र तो खटल्याच्या सुनावणीसाठी हजर राहत नव्हता. त्यामुळे त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने फरार आरोपी घोषित केले होते. तसेच त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश खार पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. मात्र अनिल हा गेल्या 19 वर्षांपासून पोलिसांना सतत गुंगारा देत होता. तरीही त्याचा पोलिसानी शोध सुरुच ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना अनिल हा त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक धापटे, पोलीस हवालदार गुरव, पोफळे, शेख पोलीस शिपाई ठोंबरे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळ वांद्रे येथे आलेल्या अनिलला पोलिसांनी ताब्यात घेतले, चौकशीत तो रॉबरीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला अटक करुन वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page