मेलमध्ये प्रवाशांच्या बॅग चोरी करणार्या मुख्य वॉण्टेड आरोपीस अटक
1.62 कोटीचा 1 किलो 98.500 ग्रॅम वजनाची तीन लगडी जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 जून 2026
मुंबई, – लांबपल्ल्याच्या मेल-एक्सप्रेसमध्ये झोपलेल्या प्रवाशांचे बॅग चोरी करणार्या कटातील एका मुख्य वॉण्टेड आरोपीस रेल्वे पोलिसांच्या स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. पुणेकर ऊर्फ शिवण्या सिताराम डिकोळे असे या आरोपीचे नाव असून या गुन्ह्यांत अटक झालेला तो चौथा आरोपी आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत रमेश बाळू डिकोळे, फुलचंद ऊर्फ परमेश्वर ऊर्फ सरपंच छगन गुजाळ आणि धनराज ऊर्फ धनंजय ऊर्फ धन्या साहेबराव गुंजाळ या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींकडून आतापर्यंत 1 कोटी 62 लाख रुपयांचे 1 किलो 98.500 ग्रॅम वजनाचे तीन सोन्याच्या लगडी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या गुन्ह्यांत इतर सहा आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी सांगितले.
अभयकुमार मदनलाल जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव परिसरात राहतात. 6 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत ते सोलापूर-कल्याण असा सिद्धेश्वर एक्सप्रेसने प्रवास करत होते. रात्री झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या सीटखालील बॅग चोरी केली होती. या बॅगेत कोट्यवधी रुपयांचे विविध सोन्याचे दागिने होते. झोपेचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी अभयकुमार जैन यांच्या ट्रॉली बॅगेतील सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते. या घटनेने त्यांना प्रचंड धक्का बसला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
या घटनेची पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त सुनिता साळुंके ठाकरे, प्रज्ञा जेडगे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला संमातर तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर रेल्वे पोलिसांनी सोलापूर-कल्याण रेल्वे स्थानकादरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकाचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजवरुन पोलिसांना दहा आरोपींची ओळख पटविण्यात यश आले होते. आरोपींची ओळख पटल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असातना रमेश डिकोळे, फुलचंद गुंजाळ आणि धनराज गुंजाळ या तिघांना पोलिसांनी अटक केली.
त्यांच्या चौकशीत त्यांनीच ही चोरी केल्याची कबुली दिली होती. मेल-एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना झोपेचा फायदा घेऊन ही टोळी प्रवाशांच्या सामानाची चोरी करुन पलायन करत होती. त्याच्या चौकशीतून पुणेकर ऊर्फ शिवण्या याच्यासह इतर सहाजणांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यांचा शोध सुरु असताना अलीकडेच पुणेकर ऊर्फ शिवण्या याला पोलिसांनी अटक केली. त्यापैकी फुलचंद्रकडून पोलिसांनी 35 लाखांची 250 ग्रॅम वजनाची एक सोन्याची लगडी तर पुणेकर ऊर्फ शिवण्याकडून 82 लाख 27 हजार 500 रुपयांची 548 ग्रॅम आणि 45 लाखांची 300 ग्रॅम वजनाची दोन सोन्याची लगड हस्तगत केली आहे. त्याची किंमत 1 कोटी 62 लाख 27 हजार 500 रुपये इतकी आहे.
या गुन्ह्यांत हिरा ऊर्फ दिपक शंकर गुंजाळ, सुरेश ऊर्फ लाल्या शंकर गुंजाळ, सागर गोपाळ डिकोळे, विकास शेषेराव ऊर्फ शशिकांत डिकोळे, भारम रामा काळे, दिलीप साहेबराव गुंजाळ या सहाजणांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून ते सर्वजण सोलापूर येथील माढाचे रहिवाशी आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
या कारवाईत पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त सुनिता साळुंके ठाकरे, प्रज्ञा जेडगे, विभागीय पोलीस उपअधिक्षक अंजना कृष्णा, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे, नंदराज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुळे, लहू सातपुते, अभिजीत टेलर, दिपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनिल लोणकर, गजानन शेडगे, भडळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव चव्हाण, संदीप गायकवाड, पोलीस हवालदार रविंद्र ठाकूर, प्रमोद दिघे, अक्षय चव्हाण, लक्ष्मण वळकुंडे, हितेश नाईक, महेंद्र कर्डीले, प्रशांत रेडेकर, सुनिल मागाडे, प्रविण घार्गे, मयुर पाटील, सतीश फडके, सोमनाथ गायकवाड, जयेश थोरात, राकेश भामरे, मिलिंद पाटील, अतुल धायडे, किशोर करपे, एकनाथ नलगे, अमर वळवी, महेश काळे, विकास रासकर, सुरेश एल्ला, वैभव शिंदे, सतीश धायगुडे, कुणाल तावडे, प्रशांत साळुंखे, अविनाश दिघे, हिरामन शिंदे, विलास घाडीगावकर, अनिलकुमार खाडे, महिला पोलीस हवालदार स्मिता वसावे, सपना शिंदे, प्रद्मा केंजळ, रजनीगंधा सानप, सोनाली पाटील, पोलीस शिपाई स्वप्नील नागरे, रुपेश निकम, रुपेश पाटील, कुणाल वालडे, महिला पोलीस शिपाई स्नेहल गडगे, तांत्रिक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश खाडे, देवीदास अरण्ये, पोलीस अंमलदार विक्रम चावरेकर, पोलीस शिपाई अमोल अहिनवे, लक्ष्मण ठोके, ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केंद्रे, कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार अमीत बडेकर, गणेश माने, पोलीस शिपाई अमोल सूर्यवंशी, अमीर ताबंळी, अंकुश धायगुडे, बोरिवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरवसे, सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन गवते, कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहिते, सोलापूर गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी जगताप, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दत्ता सोमवाड आदींनी सहभाग घेतला होता.