विलेपार्ले येथे शीतप्रेयात दारु असल्याचे समजून फिनाईन प्राशन

हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान 45 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यू

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
9 जून 2026
मुंबई, – स्प्राईट या शीपेयात दारु असल्याचे समजून एका 45 वर्षांच्या व्यक्तीने फिनाईन प्राशन केल्याची घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. विजय जनार्दन बागडे असे या मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्याविरुद्ध एअरपोर्ट पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. सुरुवातीला विजयने आत्महत्या केल्याची चर्चा होती, मात्र त्याने आत्महत्या केल्याचे काही पुरावे प्राप्त झाले नाही. दारु समजून त्याने शीतपेयातील फिनाईन प्राशन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे तपास अधिकारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद खरात यांनी सांगितले.

ही घटना रविवारी विलेपार्ले येथील एअरपोर्टजवळील शास्त्रीनगर परिसरात घडली. याच परिसरात विजय हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. तो काहीच कामधंदा करत नव्हता. त्यातच त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. रविवारी तो सकाळपासून मद्यप्राशन करत होता. काही वेळानंतर त्याने स्प्राईड या शीतपेयात दारु असल्याचे समजून फिनाईल प्राशन केले होते. त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले होते, त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

तिथे उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती हॉस्पिटलमधून प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद खरात यांच्यासह इतर पोलिसांनी धाव घेतली होती. प्राथमिक तपासात विजयने आत्महत्या केली नसून चुकून त्याने दारु समजून फिनाईन प्राशन केल्याचे उघडकीस आले. त्यात त्याची प्रकृती बिघडली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी त्याच्या कुटुंबियांची जबानी नोंदविण्यात आली आहे. विजयच्या मृत्यूमागे काहीही घातपात नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी एअरपोर्ट पोलिसांनी एडीआरची नोंद केली असून त्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद खरात हे तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page