सतत पाठलाग करुन लष्करी महिला अधिकार्याचा मानसिक शोषण
मानसिक शोषण केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ जुलै २०२६
मुंबई, – कोलकाता, पंजाब, हरियाणानंतर मुंबईत एका महिला लष्करी अधिकार्याचा पाठलाग करुन तिचा मानसिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महिला अधिकार्याच्या लेखी तक्रार अर्जानंतर बरिंदरसिंग कुल्लर नावाच्या आरोपीविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बरिंदरसिंगविरुद्ध कोलकाता आणि हरियाणाच्या स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्याच्याविरुद्ध आता मुंबईत आणखीन एका गुन्ह्यांची भर पडली आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपवीविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश आझाद मैदान पोलिसांना देण्यात आले आहे.
यातील तक्रारदार महिला लष्करी अधिकारी असून ती पंजाबच्या लुधियाना शहरात वास्तव्यास आहे. तिची सध्या पेस्टिंग काश्मीर खोर्यात आहे. १८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत फुल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ती सहभागी होण्यासाठी मुंबईत आली होती. अंतिम रेषेच्या सुमारे दोन किलोमीटर आधी तिला एका अज्ञात व्यक्तीने हाक मारली होती. तिने मागे वळून पाहिल्यानंतर तिला हाक मारणारा व्यक्तही बरिंदरसिंग कुल्लर हा होता. ते दोघेही एकमेकांशी परिचित असून तो सध्या पंजाबच्या जालधंर, रणजीतनगर, रहिवाशी १७० मध्ये राहतो. गेल्या काही वर्षांपासून तो तिचा सतत पाठलाग करतो, ती त्याला टाळण्यचा प्रयत्न करुनही तो तिचा सतत मानसिक शोषण करत होता. तिची बदनामी करण्याच्या उद्देशाने त्याने तिचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले होते. त्यामुळे तिने कोलकाता येथील बालीगंज पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती.
याच गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली होती. या गुन्ह्यांत सध्या तो जामिनावर आहे. त्याचा जामिन रद्द होण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून प्रयत्न सुरु असताना तो जामिनावर बाहेर आल्यानंतरही तिचा पाठला करुन तिच्याशी सतत बोलण्याचा प्रयत्न करत होता. सप्टेंबर २०२५ आणि मार्च २०२६ रोजी त्याने डेहरादून शहरात तिचा दोन ते तीन वेळा पाठलाग केला होता. याबाबत तिने काही पुरावे पोलिसांनी स्थानिक पोलिसांना दिले होते. या पुराव्यानंतर त्याच्याविरुद्ध डेहरादूर पोलिसांनी गुन्हा केला होता. त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल होऊन तो तिच्या मागे मुंबईत आला होता. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करुन तिला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला होता.
त्याच्या या मानसिक शोषणाला कंटाळून तिने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात एक खाजगी याचिका सादर केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने तिला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश जारी केले होते. मात्र पोलीस संरक्षण हरियाणा आणि पंजाब राज्यापुरती सिमित असल्याने तिला दुसर्या राज्यात जाताना अनेकदा भीती वाटत होती. मुंबईतील घटनेने तिच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाले होते. त्यामुळे तिने आझाद मैदान पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत बरिंदरसिंग कुल्लर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला सिंगल मदर असून ती पूर्णवेळ नोकरी करते.
कामासह सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी तिला अनेकदा प्रवास करावा लागतो. बरिंदरसिंग हा सतत पाठलाग करुन तिचा मानसिक शोषण करतो, त्यामुळे ती सध्या भीतीच्या वातावरण स्वतचे जीवन जगत आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी ठोस कारवाई करुन त्याच्या त्रासापासून तिची सुटका करावी, तिच्यासह इतर महिलांना सुरक्षित जगता यावे यासाठी त्याच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती. या तक्रारीनंतर वरिष्ठांकडून आझाद मैदान पोलिसांना संबंधित आरोपीविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहे. एका लष्करी महिला अधिकार्याला आलेला अनुभव पाहता आपल्या देशात महिला सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.