तेरा वर्षांच्या प्रेयसीवर ३२ वर्षांच्या प्रियकराकडून लैगिंक अत्याचार

गुन्हा दाखल होताच आरोपी प्रियकराला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जुलै २०२६
मुंबई, – लग्नाचे आमिष दाखवून एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच ३२ वर्षांच्या प्रियकराने लैगिंक अत्याचार केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताख रोहन नावाच्या आरोपी प्रियकराला समतानगर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीसह आरोपीची लवकरच मेडीकल केली जाणार आहे.

तेरा वर्ष सात महिन्यांची पिडीत मुलगी कांदिवली परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून सध्या ती शिक्षण घेते. याच परिसरात आरोपी रोहन राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. मैत्रीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. बुधवारी ८ जुलैला सायंकाळी पावणेसात वाजता ते दोघेही कांदिवली परिसरात भेटले होते. तिथेच त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिच्याशी अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न करु लागला होता. तिने विरोध करुनही तो तिला आपण लवकरच लग्न करु असे सांगून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता.

तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबियांना जिवंत सोडणार नाही अशी धमकीच त्याने तिला दिली होती. या प्रकारामुळे ती प्रचंड घाबरली होती. सुरुवातीला तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र नंतर तिने घडलेला प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर त्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पिडीत मुलीच्या जबानीवरुन पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलीचा रिक्षाचालकाकडून विनयभंग
दुसर्‍या घटनेत पंधरा वर्षांच्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा रिक्षाचालकाने नकोसा स्पर्श करुन विनयभंग केल्याची घटना खार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बळीत मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध खार पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर रिक्षाचालक पळून गेल्याने परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

३५ वर्षांची तक्रारदार महिला सांताक्रुज परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. पंधरा वर्षांची बळीत तिची मुलगी असून ती खार परिसरातील एका नामांकित शाळेत शिकते. गुरुवारी सकाळी आठ वाजता ती तिच्या आजीसोबत शाळेत जात होती. रिक्षाने प्रवास करताना रिक्षाचालक तिच्या चेहर्‍यासमोरच त्याचा चेहरा आणून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. तिच्या प्रायव्हेट पार्टला पाहून तिच्याकडे पाहून हात लावत होता. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र शाळा समोर आल्यानंतर त्याने जाताना तिच्या पार्श्‍व भागाला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. घडलेला प्रकार तिने शाळेतून घरी आल्यानंतर तिच्या तक्रारदार आईला सांगितला.

या माहितीने तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिला सोबत घेऊन खार पोलीस ठाण्यात आली आणि तिने घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. या मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश खार पोलिसांना दिले होते. या आदेशांनतर पोलिसांनी सांताक्रुज-खार दरम्यानचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन रिक्षाच्या क्रमांकासह आरोपी चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page