लाचेची मागणी करणार्‍या पोलीस अंमलदाराविरुद्ध गुन्हा दाखल

हॉटेल चालविण्यासाठी दरमाह अडीच हजाराची लाचेची मागणी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ जुलै २०२६
मुंबई, – पश्‍चिम उपनगरातील एका हॉटेल व्यावसायिकाकडे पाच हजाराची लाचेची मागणी केल्याप्रकरणी खार पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अनिल जाधव यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल चालविण्यासाठी दरमाह अडीच हजाराची मागणी करुन अनिल जाधव यांनी चार महिन्यांचे दहा हजाराची मागणी करुन पाच हजार रुपयांची लाच स्विकारची तयारी दर्शविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत त्यांची संबंधित अधिकार्‍यांकडून लवकरच चौकशी होणार आहे. गेल्या काही वर्षांत लाचेची मागणी करणार्‍या खार पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराविरुद्ध गुन्हा होण्यावी ही तिसरी घटना आहे. यापूर्वी एका अधिकार्‍यासह पोलीस अंमलदाराविरुद्ध लाच घेताना या अधिकार्‍यांनी कारवाई केली होती.

यातील तक्रारदार पश्‍चिम उपनगरात राहत असून त्यांच्या मालकीचे खार परिसरात एक झुणकाभाकर केंद्र आहे. झुणका भाकर केंद्रास परवानगी असलेल्या जागेवर ते भाडेतत्त्वावर हॉटेल चालवत होते. १५ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या हॉटेलमध्ये पोलीस अंमलदार अनिल जाधव आले होते. त्यांनी त्यांना तिथे हॉटेल सुरु ठेवायचे असेल तर त्यांना दरमाह अडीच हजार रुपये द्यावे लागतील. तसेच मागील चार महिन्यांचे अडीच हजारप्रमाणे दहा हजार रुपये द्यावे लागेल. नाहीतर त्यांच्या हॉटेलवरव कारवाईची धमकी दिली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अनिल जाधव यांच्याविरुद्ध १२ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

या तक्रारीची नंतर शहानिशा करण्यात आली होती. त्यात अनिल जाधव यांनी तक्रारदार हॉटेल व्यावसायिकाला हॉटेल सुरु ठेवण्यासाठी दहा हजाराची मागणी करुन पाच हजार रुपयांची लाच स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे सात महिन्यानंतर त्यांच्याविरुद्ध कलम सात भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांची अनिल जाधवची चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक रजनी उंबरकर करत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page