सीजेपी आंदोलनात चुकीची माहिती पसरवण्याचा कट?

५०० हून अधिक प्रोफाईल्सची ओळख पटविण्यात यश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ जुलै २०२६
मुंबई, – दिल्ली येथील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केले होते. या आंदोलनात सीमेपलीकडून चुकीची माहिती पसरवण्याचा कट रचल्याचे महाराष्ट्र सायबरच्या अहवालात समोर आले आहे. महाराष्ट्र सायबरने ५०० हुन अधिक सोशल मीडिया प्रोफाइल्स ओळखले आहे. १०० खाती ही पाकिस्तान आणि मध्य पूर्वेकडील देशांमधून चालवली जात होती असा अहवाल महाराष्ट्र सायबरने दिला आहे.

नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने काही विद्यार्थ्याने आत्महत्या केल्या होत्या. शिक्षण क्षेत्रात बदल यासाठी कॉकरोच जनता पार्टी ने दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन छेडले होते. या बाबत महाराष्ट्र सायबर सेलच्या टीम ने एक अहवाल तयार केला आहे. सायबर पथकाने काही खाती तपासली आहे. जी प्रामुख्याने पाकिस्तान आणि मध्य पूर्वेकडील देशांमधून चालवली जात होती. आंदोलनाचे दिशाभूल करणारे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जात होते.

कॉकरोच जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनानंतर महाराष्ट्र सायबरने विशेष तंत्रज्ञान आधारित पाळत ठेवली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या एआय (आर्टिफिशन इंटेलिजन्स) आणि डीपफेक सामग्रीची व्यापक ओपन सोर्स इंटेलिजन्स (ओएसआयएनटी) मेटाडेटा विश्लेषण, आणि फॉरेन्सिक तपासणीचा समावेश होता.

तपासणी दरम्यान महाराष्ट्र सायबरने सोशल मीडिया खात्याचे एक सुसंघटित जाळे ओळखले, खोटी आणि दिशाभूल करणारी आणि ए आय निर्मित सामग्री पसरवली जात होती. अशांतता भडकावणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे हा हेतू होता. भारतीय प्रेक्षकांना लक्ष्य करून दिला भूल करणाऱ्या गोष्टीचा प्रचार करत होते असे महाराष्ट्र सायबर चे म्हणणे आहे. तसेच महाराष्ट सायबर ने अशा खात्या विरोधात तात्काळ कारवाई सुरु केली. सोशल मीडिया मार्फत आक्षेपार्ह मजकूर काढून टाकले. तसेच महराष्ट्र सायबरने इंस्टाग्राम, एक्स, मेटा आणि युट्युब अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ४२९ आक्षेपार्ह पोस्ट आणि हॅन्डल्स ओळखले आहे.

महाराष्ट्र सायबरच्या तपासात आणखी एक बाब समोर आली . आंदोलना दरम्यान १०० खाती ही भारताबाहेरून कार्यरत होती. तसेच सायबर पथकाने १४० हुन अधिक पोस्ट तपासल्या. त्यात एआय निर्मित किंवा एआय सहायित मजकूर होता. एआय निर्मित सामग्रीची देखील सविस्तर तपासणी केली गेली. डिजिटल पद्धतीने अतिशयोक्ती केलेली दृश्ये, कृत्रिम आवाजाची निर्मिती, क्लोन केलेला ऑडिओ आणि खोटे नावाने केलेल्या व्हिडिओचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page