नामाकिंत कंपनीच्या दूधाच्या पिशवी बनविणार्‍या कारखान्यांवर छापा

आतापर्यंत चार आरोपींना पावणेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२६
मुंबई, (प्रतिनिधी) – नामांकित दूध कंपनीच्या दूधाच्या पिशव्या बनविणार्‍या एका कारखान्यावर दहिसर युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी कारवाई केली. या गुन्ह्यांत आतापर्यंत मुख्य आरोपीसह चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. लिंगय्या मिक्षमाया गंटा, सौदुलु यादया जंगीली, यादवा चंद्रया बतुल्ला रामुलू गुरुवर्या बोडूपपल्ली अशी या चौघांची नावे आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी अमुल आणि गोकुळ कंपन्याचे २९ हजार ७५० रुपयांचे ४७० दूध, अमूल कंपनीच्या तेरा हजार बोगस पिशव्या, प्लास्टिक साहित्य, दूध भेसळीसाठी लागणारे साहित्य, मशिन, चार मोबाईल असा १० लाख ७९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दहिसर येथील राजेश कंपाऊंड, दुबे चाळीत काहीजण दूधात भेसळ करुन त्याच दूधाची परिसरात विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे छापा टाकून लिंगय्या गंटा आणि नंतर सौदुलू जंगीली या दोघांना अटक केली होती. ९ जुलैला केलेल्या या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात भे

सळयुक्त दूधासह इतर साहित्य जप्त केले होते. या दोघांच्या चौकशीत यादवा बतुल्ला आणि रामलू बोडूपल्ली यांचे नाव समोर आले होते. या गुन्ह्यंतील ते दोघेही मुख्य आरोपी असल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही मोहीम सुरु असताना या कटातील दोन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केली. त्यांच्या चौकशीतून आलेल्या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप येडे-पाटील, पोलीस निरीक्षक् बाळसाहेब राऊत, पूजा खांडेकर, विजय रासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर मुजावर, युवराज चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक किरण कोते, पोलीस उपनिरीक्षक अजय सावंत व अन्य पोलीस पथकाने वसईतील बाबूभाई शहाणी कंपाऊंड, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटसमोरील एका कारखान्यात छापा टाकला होता. या ठिकाणी अमूल दूध या नामांकित कंपनीच्या पिशव्या बनविल्या जात असल्याचे उघडकीस आले.

घटनास्थळाहून पोलिसांनी पिशव्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य, मशिनरी असा सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. यातील मुख्य आरोपी २०२१ पासून मुंबईसह उपनगरात दूध भेसळीसाठी लागणारे बोगस पिशव्या विक्रीचे काम करत होता. या गुन्ह्यांत आतापर्यंत चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या अटकेने दूधात भेसळ करणार्‍या तसेच भेसळयुक्त दूधाची विक्री करणार्‍या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page