विवाहीत असलेल्या जावयाची लग्न म्हणून दुसर्‍या पत्नीची हत्या

पहिल्या पत्नीच्या पित्यासह भावाला हत्येच्या गुन्ह्यांत अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – विवाहीत असलेल्या जावयाची लग्न म्हणून दुसर्‍या पत्नीची गळा आवळून हत्या करुन तिच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने तिचा मृतदेह खाडीजवळ फेंकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पहिल्या पत्नीच्या पित्यासह भावासह वाकोला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनीच ही हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हत्येच्या याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून सोमवारी दुपारी दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.

सांताक्रुज येथे साकिब सिद्धीकी हा ३२ वर्षांचा तक्रारदार राहत असून त्याने दोन विवाह केले होते. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव सेहरीन आणि दुसरी पत्नीचे नाव रुक्साना आहे. २८ ऑगस्टला सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला होता. दुपारी घरी आल्यानंतर त्याला त्याची पहिली पत्नी सेहरीन ही घरीच असल्याचे तर रुक्साना घरात नसल्याचे दिसून आले. त्याने तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने वाकोला पोलिसांत रुक्सानाची मिसिंग तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मिसिंग तक्रार नोंदवून तिचा शोध सुर केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना पोलिसांना साकिबच्या घरी दुसर्‍या लग्नावरुन वाद सुरु असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांनी घरातील प्रत्येक सदस्यांची चौकशी सुरु केली होती. याच प्रकरणात सेहनीनच्या वडिलांसह भावाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनीच रुक्सानाची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. हत्येनंतर तिचा मृतदेह खाडीजवळ फेंकून त्यांनी हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. साकिबने रुक्साना सुरु केला, मात्र त्याला ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्याने पोलिसांत तिच्या मिसिंगची तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर दोन्ही पिता-पूत्र पळून गेले होते. हाच धागा पकडून पोलिसांनी पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला होता. अखेर तांत्रिक माहितीवरुन या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर या हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. ज्या ठिकाणी त्यांनी रुक्साना मृतदेह फेेंकून दिला होता, तेथून पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. साकिब हा विवाहीत होता, तरीही रुक्सानाने त्याच्याशी दुसरा विवाह केला होता. त्याचा आरोपींच्या मनात राग होता. त्यामुळे त्यांनी तिची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता,

या दोघांविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी दुपारी त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याची चौकशी करुन त्यांच्याविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा भर असेल असे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page