पतीच्या वाढदिवशीच पत्नीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

नशेच्या आहारी गेलेल्या ३० वर्षांच्या आरोपी पतीला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – ड्रग्जच्या आहारी गेलेल्या पतीकडून होणार्‍या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून कल्पना भिमसिंग बहाूदर ऊर्फ कल्ना अनिल विश्‍वकर्मा नावाच्या एका २० वर्षांच्या महिलेने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी पती अनिल नारायण विश्‍वकर्मा याला एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. विशेष म्हणजे अनिलच्या वाढदिवशी म्हणजे ११ ऑक्टोंबरला कल्पनाने छताला ओढणीने गळफास घेऊन स्वतचे जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले.

भीमसिंग लालसिंग बहादूर हे मूळचे नेपाळच्या सिलीगुडी, दोटीचे रहिवाशी आहे. सध्या ते सेंट थॉमस चर्चमध्ये असून सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. गेल्या वीस वर्षांपासून ते त्यांच्या कुटु्रंबियांसोबत बोरिवलीतील आयसी कॉलनीत राहतात. कल्पना ही त्यांची लहान मुलगी असून तिचे २० एप्रिल २०२४ रोजी अनिल विश्‍वकर्मा याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर ते दोघेही दहिसर येथील नवागाव, शिव मंदिरासमोरील शास्त्रीनगर परिसरात राहत होते. त्यावेळेस अनिल हा एका केक शॉपमध्ये काम करत होता. याच दरम्यान त्याला ड्रग्जचे व्यसन लागले होते. अनेकदा तो ड्रग्जच्य नशेत कल्पनाला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. त्यांचा संसास टिकावा यासाठी ते त्याची समजूत काढत होते, मात्र त्याच्या स्वभावात काहीच फरक पडला नव्हता.

नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीतर गोंधळ घालत होता. पैसे घेतल्यानंतर तो घरातून निघून जात होता. एक वर्षांनी कल्पनाने एका मुलीला जन्म दिला, मुलीच्या जन्मानंतर त्याच्या सुधारणा होईल असे तिला वाटत होते, मात्र तो तिचा जास्तच मानसिक शोषण करत होता. जून २०२५ रोजी अनिलच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर त्याचे ड्रग्ज सेवन करण्याचे प्रमाण जास्त वाढले होते. कल्पना ही विविध घरी जाऊन धुणी भांडी करण्याचे काम करत होती. तिला मिळणार्‍या पैशांतून तो नशा करत होता. तिच्यासह तिचा मुलीचा सांभाळ करत होता. नशा करण्यावरुन त्यांच्यात सतत खटके उडत होते.

११ ऑक्टोंबरला भीमसिंग हे दुसर्‍या रुममध्ये शिफ्ट करत होते. त्यावेळेस कल्पना ही त्यांना दुपारचे जेवण घेऊन आली होती. त्याच दिवशी अनिलचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांनी तिला अनिलसाठी एक केक आणण्यासाठी पाचशे रुपये दिले होते. मात्र पाचशे रुपयांवरुन त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. पतीकडून होणार्‍या मानसिक आणि शोषणाला कल्पना ही प्रचंड कंटाळून गेली होती. त्यातून तिला प्रचंड नैराश्य आले होते. त्यामुळे रात्री पावणेदहा वाजता तिने घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही माहिती भीमसिंग यांना समजताच ते सर्वजण कल्पनाच्या घरी गेले होते. तिथे त्यांना कल्पनाने छताला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी तिला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच एएमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी भीमसिंग बहादूर यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांनी त्यांच्या जबानीत कल्पनाच्या आत्महत्येला तिचा पती अनिल विश्‍वकर्मा हाच जबाबदार असल्याचा आरोप केला. नशेसाठी तो तिचा मानसिक व शारीरिक शोषण करत होता. त्याला कंटाळून तिने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी अनिल विश्‍वकर्माविरुद्ध कल्पनाचा मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page