एटीएमची दहा लाखांची कॅश असलेली कॅसेट कर्मचार्‍यांनी पळविली

गुन्हा होताच दोघांना तर पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – एटीएम मशिनमध्ये जमा करण्यासाठी दिलेल्या दहा लाखांची कॅश असलेली कॅसेट कंपनीच्या चार कर्मचार्‍यांनी चोरी केल्याची घटना भायखळा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चारही कर्मचार्‍याविरुद्ध भायखळा पोलिसांनी चोरीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. सोनू रमेशचंद्र प्रजापती, सुरेंद्रकुमार चंद्रभान, अजयकुमार रमेश प्रजापती आणि सुनिलकुमार जियालाल अशी या चौघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत सोनूसह दोघांना पोलिसांनी अटक केली तर दोन कर्मचारी पळून गेले आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. आरोपींकडून लवकरच चोरीची संपूर्ण कॅश हस्तगत केली जणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांनी सांगितले.

आशिष मुन्नालाल जैन हे कुर्ला येथे राहत असून गेल्या बारा वर्षांपासून क्लिअर सिक्युअर्ड सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीत ब्रॅच मॅनेजर म्हणून काम करतात. या कंपनीचे हिताशी कॅश मॅनेजमेंट कंपनीशी एक करार आहे. या करारानुसार त्यांची कंपनी हिताशी कंपनीला मनुष्यबळ पुरविण्याचे काम करते. गेल्या काही वर्षांत कंपनीने हिताची कंळपनीला एक हजाराहून कर्मचारी पुरविले आहेत. हिताची कंपनीची भायखळा परिसरात एक शाखा असून या शाखेतून विविध बँकांकडून रोख रक्कम घेऊन त्यांच्या एटीएम मशिनमध्ये पैसे जमा करण्याचे काम चालते. तिथे ६५ कामगार कामाला आहेत.

१६ ऑक्टोंबरला दुपारी सव्वाबारा वाजता कंपनीकडून कॅश डिलीव्हरीसाठी सोनू प्रजापती आणि संतोष गवताडे यांना पाठविण्यात आले होते. त्यांच्याकडे १५ कॅसेटमध्ये ४८ लाख रुपयांची कॅश होती. ही कॅश त्यांना वेगवेगळ्या २८ एटीएम मशिनमध्ये जमा करायची होती. रात्री आठ वाजता ते दोघेही कॅश जमा करुन कार्यालयात हजर झाले होते. यावेळी त्यांनी दैनदिन कामाचा अहवाल ऑपरेशन सहाय्यक अंबादास तायडे यांना सादर केला होता. रात्री बारा वाजता सर्व कॅसेट साकिनाका येथील ब्रॅच कार्यालयात पाठविण्यात आले होते. तिथे कॅसेटची मोजणी करताना संबंधित अधिकार्‍यांना पाचशे रुपयांच्या दोन हजार नोटा म्हणजे दहा लाखांची कॅश नसल्याचे दिसून आले.

याबाबत या अधिकार्‍यांनी अंबादास तायडे यांच्याकडे विचारणा केली असता सोनूने एक कॅसेट दुसर्‍या एटीएममध्ये चुकून टाकल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. याबाबत सोनू आणि संतोषची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत सोनूने सुरेंद्रकुमार, अजयकुमार आणि सुनिलकुमार यांच्या सांगण्यावरुन दहा लाखांची कॅश असलेली कॅसेट चोरी केल्याची कबुली दिली. या संपूर्ण प्रकरणात संतोषचा काहीही संबंध नसून त्याला याबाबत काहीही माहिती नव्हते असे सांगितले.

एटीएम मशिनमध्ये जमा करण्यासाठी दिलेली दहा लाखांची कॅश असलेले कॅसेट संबंधित चारही आरोपींनी चोरी केल्याचे उघडकीस येताच कंपनीच्या वतीने आशिष जैन यांनी भायखळा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल सोनू प्रजापती, सुरेंद्रकुमार चंद्रभान, अजयकुमार प्रजापती आणि सुनिल जियालाल या चौघांविरुद्ध एटीएम कॅशच्या चोरीसह अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सोनूसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून लवकरच चोरीची कॅश हस्तगत केली जाणार आहे. या गुन्ह्यांत दोन कर्मचारी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page