अंधेरी येथे एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी पती-पत्नीला अटक

आरोपीकडून साडेतेरा लाखांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – अंधेरी येथे एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी पती-पत्नीला डी. एन नगर पोलिसांनी अटक केली. तौफिक सुफियान शेख आणि मुस्कान तौफीक शेख अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी ६७ ग्रॅम एमडी जप्त केले असून त्याची किंमत साडेतेरा लाख रुपये आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत दोघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही महिन्यांत मुंबई पोलिसांनी ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. वरिष्ठांच्या आदेशानंतर सर्वच स्थानिक पोलिसांकडून अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध कारवाई सुरु होती. डी. एन नगर पोलीस ठाण्याचे सूत्रे हाती घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश ऍण्टी नारकोटीक्स सेलला दिले होते. सोमवारी १९ ऑक्टोंबरला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिस गवस, पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऍण्टी नारकोटीक्स सेलचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार सूर्यवंशी, पोलीस हवालदार हळदे, बांगर, घुगे, कांबळे, पोलीस शिपाई शशिकांत बांगर , वाकोडे, सासणे आदी पथक परिसरात गस्त घालत होते. अंधेरीतील सागर सिटी, गिल्बर्ट हिल रोड, मेरी डेरियन इमारतीसमोर गस्त घालताना पोलिसांना एक जोडपे संशयास्पदरीत्या फिरत असताना दिसून आले.

या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना ६७ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सुमारे साडेतेरा लाख रुपये इतकी आहे. तपासात आरोपी पती-पत्नी असून ते सागर सिटी, इंडियन ओशियन इमारतीच्या फ्लॅट क्रमांक ८०२ मध्ये राहतात. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर दोघांनाही स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांना ते ड्रग्ज कोणी दिले, ते ड्रग्ज कोणाला देण्यासाठी आले होते. त्यांनी यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का, त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page