मिरागो ग्लोबल फाऊनडेशन संस्थेच्या १.४४ कोटीचा अपहार

दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या संस्थेच्या डेप्युटी मॅनेजर अकाऊंटटला अटक

0

अरुण सावरटकर
११ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – मालाड येथील नामांकित मिरागो ग्लोबल फाऊनडेशनच्या व्हिबग्योर संस्थेच्या मेल आयडीसह स्वतच्या पदाचा गैरवापर करुन संस्थेच्या १ कोटी ४४ लाखांचा अपहार करुन वैयक्तिक फायद्यासाठी फसवणुक केल्याप्रकरणी ताहीर नूर खान या डेप्युटी मॅनेजर अकाऊंटटला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच ताहीर हा पळून गेला होता. अखेर दिड वर्षांनी वॉण्टेड असलेल्या ताहीरला गजाआड करण्यत पोलिसांना यश आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जून २०२४ ते जून २०२५ या एका वर्षांत ताहीर हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

पवन मांगीलाल लोहियाा हे बोरिवलीतील सिद्धार्थ नगरचे रहिवाशी असून ते त्यांच्या पत्नीसोबत राहतात. मालाड येथील इन्फिनिटी मॉलजवळील माईडस्पेस, इंटरफेस ११ मध्ये असलेल्या मिरागो ग्लोबल फाऊंनडेशनच्या व्हिबग्योर हायस्कूलमध्ये मुख्य अकाऊंटट म्हणून काम पाहतात. मिराबो ग्लोबल फाऊनडेंशनसोबत पिनकॅल ग्लोबल फाऊनडेशन, नोबेल फाऊनडेशन, रुस्तम केरावाल फाऊनडेशन, के जे फाऊनडेशन, एम्पायर फाऊनडेशन, एड्युस्पार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आदी संस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मिराबो ग्लोबल फाऊनडेशनच्या वतीने मुंबईसह संपूर्ण देशभरात व्हिबग्योर ग्रुप ऑफ स्कूल या नावाने शाळा सुरु आहेत.

या शाळेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचे तीन, सहा महिने तसेच वार्षिक शुल्क, बस, कॅन्टीन, स्पोर्टस आदीचे फी त्यांच्या पालकांकडून घेतले होते. अनेकदा बहुतांश व्यवहार धनादेश किंवा ऑनलाईन होते, काही पालकांनी कॅश स्वरुपात फी दिली की दुसर्‍या दिवशी ती कॅश बँकेत जमा केली जाते. शाळेतील पालक अनेकदा त्यांच्या मुलांची एकाच वेळेस वार्षिक फी भरतात, एखाद्या विद्यार्थ्याने मध्येच शाळा सोडल्यास त्यांना उर्वरित फी परत केली जाते. याच संस्थेत ताहीर खान हा डेप्युटी मॅनेजर अकाऊंट म्हणून काम पाहत होता. एखाद्या पालकांना त्यांची फी परत करायची असेल तर ती रक्कम त्याच्या परवानगी त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जात होती. त्यासाठी संस्थेने त्याला एक संगणक आणि मेल आयडी दिला आहे. त्याचा व्यवहार त्याच्याशिवाय कोणालाही करता येत नाही. त्याचा रिपोर्ट नंतर ताहीर हा संस्थेच्या संचालकांना सादर करत होता.

१७ जून २०२५ रोजी संस्थेचे ऑडिट झाले होते. यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी शाळा किंवा इतर ऍक्टिविटी मधेच सोडली आहे, अशा सर्व विद्यार्थ्याचे पैसे रिफंड करण्यात आलेल्या बँक खात्याची माहिती घेण्यात आली होती. यावेळी काही कर्मचार्‍यांना निलोफर शेख या नावाच्या बँक खात्यात एकापोक्षा जास्त वेळा पैसे ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. याबाबत माहिती घेताना तिच्या बँक खात्यात काही महिन्यांत ४४ लाख ८६ हजार ०४२ रुपये ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने या बँक खात्याबाबत अधिक माहिती काढण्यात आली होती.

१२ जून २०२४ ते २० जून २०२५ या कालावधीत निलोफर शेख हिच्या खात्यात १ कोटी ४४ लाख रुपये ट्रान्स्फर झाले होते. चौकशीदरम्यान ताहीर खान याने स्वतसह त्याच्या परिचित व्यक्तीचे प्रत्येकी एक बँक खात्यात वाढून त्याची पेमेंट फाईल तयार केली होती. त्याने स्वतच्या पदाचा दुरुपयोग करुन वैयक्तिक फायद्यासाठी संस्थेच्य १ कोटी ४४ लाखांचा अपहार करुन ही फसवणुक केल्याचे तपापसात उघडकीस आले होते. या प्रकारानंतर संस्थेच्या वतीने पवन लोहिया यांनी बांगरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ताहीर खान याच्याविरुद्ध संस्थेच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच ताहीर हा पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या ताहीर खान याला तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने संस्थेत स्वतच्या पदाचा गैरवापर करुन आर्थिक व्यवहार केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत केली आहे का, गुन्ह्यांतील रक्कमेचा त्याने कुठे आणि कशा प्रकारे विल्हेवाट लावली याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page