शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने नेव्ही ऑफिसरची फसवणुक

८४ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी वॉण्टेड आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने एका नेव्ही ऑफिसरची सुमारे ८४ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी हिराराम माना पटेल या २५ वर्षांच्या आरोपीस दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. हिराराम हा मूळचा राजस्थानचा रहिवाशी असून तो सध्या कल्याण येथे राहतो. त्याच्या बँक खात्यात २६ लाख ५० हजार रुपये जमा झाले होते. ही रक्कम त्याने सायबर ठगांना दिली होती, त्यामोबदल्यात त्याला काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. फसवणुकीसाठी त्याने सायबर ठगांना बोगस बँक खाते पुरविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

वेमारेड्डी रमणा रेड्डी हे कुलाबा येथील मिलिटरी स्टेशन, नेव्ही ऑफिसर फॅमिली रेसीडेन्शियल परिसरात राहतात. गेल्या ३५ वर्षांपासून नेव्ही ऑफिसर म्हणून काम करत असून सध्या वरिष्ठ कॅप्टन म्हणून काम करतात. त्यांनी शेअरमध्ये काही रक्कम गुंतवणुक केली होती. शेअरसंदर्भात ते नेहमीच सोशल मिडीयावरुन माहिती घेतात. याच साईटवरुन त्यांना वरुण नावाच्या एका व्यक्तीची ओळख झाली होती. त्यांनी त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल केले होते. या ग्रुपमध्ये शेअरसंदर्भातील दैनदिन माहिती दिली जात होती. त्यात शेअरमध्ये अनेकांना फायदा होत असल्याचे दिसून येत होते. यावेळी ग्रुप ऍडमिनने त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी विविध अकाऊंटमध्ये ८४ लाख ४६ लाख ५५१ रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम भरल्यानंतर त्यांना आणखीन पैसे भरण्यास प्रवृत्त केले जात होते. मात्र त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांना शेअरसंदर्भातील मॅसेज येणे बंद झाले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे गुंतवणुक केलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी ऍडमिनने त्यांना ते सध्या बिझनेस ट्रिपवर असून त्रास देऊ नका. तुम्हाला तुचे जूनमध्ये कोर्स पूर्ण झाल्यानंतर मिळतील असे सांगितले.

मात्र जूनमध्ये त्यांना पैसे मिळाले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, १२० बी भादवी सहकलम ६६ सी, ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे अधिकारी करत होते.तपासादरम्यान त्यांची ट्रान्स्फर केलेल्या रक्कमेपैकी २६ लाख ५० हजार रुपये हिराराम पटेल याच्या विनायक एजन्सीच्या बँक खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने या बँक खात्याची माहिती काढली होती. याच गुन्ह्यांत हिरारामला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीत त्यानेच फसवणुक करणार्‍या सायबर ठगासाठी स्वतच्या व्यवसायाच्या नावाने विविध बँकेत खाते उघडल्याचे सांगितले. या खात्यात आतापर्यंत ४३ फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम जमा झाली होती. ही रक्कम त्याने संबंधित सायबर ठगांना दिल्यानंतर त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन देण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page