राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाच्या हत्येचा पर्दाफाश

पूर्ववैमस्नातून हत्या करणार्‍या तिन्ही मारेकर्‍यांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्य अजीत पवार गटाचे भायखळा तालुका अध्यक्ष सचिन राममुरत कुर्मी (४६) यांच्या हत्येचा पर्दाफश करण्यात अखेर भायखळा पोलिसांना यश आले. हत्येनंतर पळून गेलेल्या तिन्ही मारेकर्‍यांना अवघ्या २४ तासांत पोलिसांनी अटक केली. आनंदा अशोक काळे ऊर्फ अन्या, विजय ज्ञानेश्‍वर काकडे ऊर्फ पप्या आणि प्रफुल्ल प्रविण पाटकर अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने १५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पूर्ववैमस्नातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

सचिन कुर्मी हे भायखळा परिसरात राहत असून त्यांचा भायखळा, आंबेवाडी आणि फेरबंदर परिसरात कैची सलून नावाचे शॉप आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा सचिन यांची घोडपदेव येथील फिरोज ऍण्ड फ्लॉवर्सजवळ काही अज्ञात व्यक्तींनी तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. या हत्येनंतर मारेकरी तेथून पळून गेले होते. ही माहिती मिळताच भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या सचिन यांना जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोति केले होते. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच भायखळा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी संमातर तपास सुरु केला होता. आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु असताना अवघ्या काही तासांत पळून गेलेल्या आनंदा काळे, विजय काकडे आणि प्रफुल्ल पाटकर या तिन्ही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यांनीच सचिन कुर्मी यांची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची कबुली दिली. पूर्ववैमस्नातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिन्ही मारेकर्‍यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना मंगळवार १५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या तिघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page