एसआरएचा फ्लॅट नावावर करुन देतो असे सांगून फसवणुक

सव्वाअकरा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – एसआरएमध्ये फ्लॅटसह अलोट झालेला फ्लॅट नावावर करुन देतो असे सांगून एका व्यक्तीकडून घेतलेल्या सव्वाअकरा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद अनिस शौकतअली शेख, मोहसीन हारुण शेख आणि तौफिक सिराज खान अशी या तिघांची नावे असून ते तिघेही अंधेरीतील रहिवाशी आहेत. तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

यातील तक्रारदार अंधेरीतील जे. पी रोड, श्रीरामवाडी गांधीनगर एसआरए इमारतीमध्ये राहतात. तिन्ही आरोपी त्यांच्या परिचित आहेत. या तिघांनी त्यांना एसआरए योजनेतील अनेक्चरमध्ये त्यांचे नाव असल्याची बतावणी करुन त्यांना एसआरएचा फ्लॅट तसेच अलोट झालेला फ्लॅट त्यांच्या नावावर करुन देतो असे सांगितले. त्यांचे एसआरए कार्यालयातील काही अधिकार्‍यांची चांगली ओळख आहे. या अधिकार्‍यांच्या मदतीने त्याचे काम करुन देतो असे सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून फ्लॅट नावावर करुन देण्यासाठी या तिघांनी जुलै ते ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत सव्वाअकरा लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत फ्लॅट तसेच फ्लॅट नावावर करुन न देता त्यांची फसवणुक केली होती. दोन वर्ष उलटूनही त्यांनी फ्लॅट दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांनी आंबोली पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मोहम्मद अनिस शेख, मोहसीन शेख आणि तौफिक खान या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page