दहा वर्षांपूर्वी झालेल्या अत्याचाराचा पर्दाफाश

पोक्सोच्या गुन्ह्यांत आरोपी मौलवीला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – दहा वर्षांपूर्वी अरेबिक भाषा शिकविताना एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा पवई पोलिसांनी पर्दाफाश करुन या गुन्ह्यांतील आरोपी मौलवीला अटक केली. मोहम्मद अस्लम हाफिझ असे या मौलवीचे नाव असून त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हा गुन्हा साकिनाका परिसरात घडल्याने आरोपीला पुढील चौकशीसाठी साकिनाका पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगितले.

बळीत अल्पवयीन मुलगी साकिनाका परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. सध्या ती बारावीत शिकत असून पवईतील एका नामांकित कॉलेजची विद्यार्थिनी आहे. २४ ऑक्टोंबरला त्यांच्या कॉलेजमध्ये काऊंसिलिंग सेशनचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कॉलेजच्या विद्यार्थिनीचे काऊसिलिंग करण्यात आले होते. त्यात बळीत मुलीने दहा वर्षांपूर्वी ती अरेबिक भाषा शिकत होता. त्यासाठी तिच्या घरी मोहममद अस्लम हा मौलवी तिला अरेबिक भाषा शिकवण्यासाठी येत होता. शिकवणीदरम्यान तो तिला विविध टास्क द्यायचा. तिच्याकडून ते टास्क पूर्ण न झाल्यास तो तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग करत होता. काही दिवस हा प्रकार असाच सुरु होता. मात्र बदनामीसह भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र कांऊसिंग सेशनदरम्यान तिने हा प्रकार सांगितला. घडलेला प्रकार तिच्या शिक्षकांना समजताच त्यांनी पवई पोलिसांना ही माहिती सांगून आरोपी मौलवीविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत सिंह दहिया, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत बांगर यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांना तपासाचे आदेश देताना संबंधित आरोपी मौलवीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, पोलीस हवालदार तानाजी टिळेकर, बाबू येडगे, पोलीस शिपाई सूर्यकांत शेट्टी यांनी अवघ्या चार तासांत आरोपी मौलवी मोहम्मद अस्लम हाफिझ याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला साकिनाका पोलिसांकडे सोपविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page