दोन वर्षांत मिसिंग-चोरी झालेले मोबाईल तक्रादारांना परत
मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी मानले पोलिसांचे आभार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – दोन वर्षांत मिसिंग-हरविलेले सुमारे १९ लाख रुपयांचे १२७ मोबाईल तक्रारदारांना अंधेरी पोलिसांकडून एका विशेष कार्यक्रमांत परत करण्यात आले. मिसिंग-हरविलेले मोबाईल पुन्हा मिळतील अशी आशा नसताना अंधेरी पोलिसांनी विविध राज्यात जाऊन मोबाईल ताब्यात घेऊन ते परत तक्रारदारांना परत केल्याने या सर्वांनी अंधेरी पोलिसाचे आभार मानले.
२०२२ ते २०२४ या कालावधीत अंधेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात काही मोबाईल मिसिंगसह चोरी झाले होते. या वाढत्या तक्रारीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश अंधेरी पोलिसांना देण्यात आले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत सिंह दहिया, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंदर, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद मगर, कृष्णा गांगुर्डे, सचिन भोसले, प्रविण वायंगणकर,, रविंद्र गांवकर, विशाल पिसाळ (तांत्रिक मदत) यांनी तपास सुरु केला होता. मिसिंगसह चोारीच्या मोबाईलचे सीईआयआर ऍपच्या माध्यमातून पोलिसांनी शोध सुरु केला होता. त्यातून आलेल्या माहितीनंतर या पथकाने कर्नाटक, उत्तरप्रदेश, बिहार, कोलकाता, झारखंड, आसाम आदी राज्यात जाऊन सुमारे १९ लाख रुपयांचे १२७ हून अधिक मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळविले होते. त्यानंतर या मोबाईलच्या मालकांचा शोध घेण्यात आला होता. समाजातील विविध घटक रिक्षाचालक, टेम्पोचालक, विद्यार्थी, मजूर, गृहिणी आदींना संपर्क साधून त्यांना एका कार्यक्रमांत त्यांचे मिसिंगसह चोरी झालेले मोबाईल परत करण्यात आले होते. मिसिंगसह चोरी झालेले मोबाईल परत मिळतील अशी कुठलीही आशा संबंधितांना नव्हती. तरीही अंधेरी पोलिसांनी ते मोबाईल शोधून त्यांना परत केले होते. त्यामुळे या सर्वांनी अंधेरी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.