मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – फोन टॅपिंग प्रकरणात वादाच्या भोवर्यात सापडलेल्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन काढल्यानंतर त्यांच्या जागी राज्याचे कायदेशीर आणि तांत्रिक विभागाचे प्रमुख संजयकुमार वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नावाची निवडणुक आयोगाकडून घोषणा होताच सायंकाळी संजयकुमार वर्मा यांनी पोलीस महासंचालक पदाचा चार्ज स्विकारला होता. ते १९९० ब्रॅचचे आयपीएस अधिकारी असून एप्रिल २०२८ साली निवृत्त होणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जवळपास साडेतीन वर्षांचा पोलीस महासंचालक पदाचा कालावघीत राहणार आहे.
रश्मी शुक्ला यांची सोमवारी निवडणुक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकावरुन बदली केली होती. त्यांच्यावर महाविकास आघाडीचे नेते, मंत्री आणि इतर राजकीय व्यक्तीचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप होता. याच प्रकणात त्यांच्याविरुद्ध मुंबईसह पुण्यात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद झाली होती. मात्र नंतर त्यांची दोन्ही गुन्ह्यांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले होते. त्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांची या गुन्ह्यांतील आरोपांतून सुटका झाली होती. रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जात असून त्यांच्या कालावधीत पूर्ण होऊन त्यांची पोलीस महासंचालक म्हणून बढती देण्यात आली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांची बदली व्हावी यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरु होते. निवडणुक आयोगाला कॉंग्रेस पार्टीच्या वतीने सतत पत्रव्यवहार करुन त्यांच्या बदलीचे मागणी केली जात होती.
अखेर सोमवारी रश्मी शुक्ला यांची बदली झाली होती. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त चार्ज देण्यात आला होता. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांचे एक पॅनल तयार करुन नव्या पोलीस महांसचालकाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली होती. अखेर मंगळवारी संजयकुमार वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्तीचे आदेश निवडणुक आयोगाकडून काढण्यात आले. त्यांच्या नावाची घोषणा होताच सायंकाळी संजयकुमार वर्मा यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची सूत्रे हाती घेतली होती.
संजयकुमार वर्मा हे १९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते २३ एप्रिल २०२८ साली सेवानिवृत्त होणार आहे. त्यांनी यापूर्वी कोल्हापूर परिक्षेत्रात पोलीस महानिीक्षक, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडामध्ये सह मुख्य दक्षता अधिकारी म्हणून काम केले आहे. सध्या ते कायदेशीर आणि तांत्रिक विभागाच्या महासंचालक पदावर कार्यरत होते. पोलीस महासंचालक म्हणून बढती मिळाल्यानंतर त्यांची ही पहिलीच पोस्टिंग होती. त्यानंतर आता त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.