मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – राज्याच्या १५ व्या विधानसभेसाठी बुधवारी (ता. २०) मुंबईसह राज्यात मतदान होणार आहे. या मतदाना साठी शहरात मुंबई पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. पैसे वाटप, दारू वाटप, वस्तू वाटपाचे किंवा अन्य अनुचित घटना घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीला महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, होमगार्ड, आणि २६ केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्या मुंबईत तैनात असणार आहेत. मतदान केंद्राबाहेर स्थानिक पोलिसांच्या सोबतीला होमगार्ड, एमएसएफचे जवान तैनात ठेवले जाणार आहे. तर वरिष्ठ अधिकारी हे वारंवार मतदान केंद्राबाहेर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत होते. मतदान केंद्राच्या १०० मीटर आवारात वाहने, फेरीवाले याना मंगळवारी सायंकाळपासून मनाई होत असे चित्र होते. तर मतदान यंत्र आणि कर्मचारी याना ने आन करण्यासाठी बेस्टच्या वाहनांना देखील विशिष्ट व्यवस्था केली होती.

बुधवारी मुंबईसह राज्यात मतदान होणार आहे. यंदाची निवडणूक ही प्रत्येक पक्षाने प्रतिष्टेची केली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. निवडणुकी दरम्यान भरारी आणि स्थिर पथकाने चांदी, पैसे पकडल्याची घटना घडल्या होत्या. निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर , विशेष पोलीस आयुक्त देवेंन् भारती याच्यासह, सह पोलीस आयुक्त , पाच अतिरिक्त आयुक्त, तीस पोलीस उपायुक्त, ८३ सहायक आयुक्त, दोन हजाराहून अधिक पोलीस अधिकारी, २५ हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक, होमगार्ड, २६ केंद्राच्या दलाच्या तुकड्या असा तगडा बंदोबस्त असणार आहे.
यंदाच्या वर्षी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त रचना करून आखला आहे. संवेदनशील मतदार संघात जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. मतदानाच्या पूर्व रात्री पैसे वाटल्याच्या घटना पाहता स्थानिक पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पैसे वाटण्याच्या आरोप प्रत्यारोपवरून काही हिंसक घटना घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. तसेच मतदानाच्या दिवशी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काहीवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आल्याचे चित्र होते.त्या सोबत सोशल मीडियावर मतदानबाबत धर्म आणि दोन जातीत तेढ निर्माण होईल असे मेसेज किंवा पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर देखील पोलीस लक्ष ठेऊन असणार आहेत. असे कृत्य करणाऱ्यावर पोलीस कडक कारवाई करणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आज मतदाना बाबत एक विडिओ जारी केला. तो विडिओ कित्येक पोलिसांनी त्याच्या स्टेट्सला ठेवला होता.
स्थानिक पोलिसांप्रमाणे वाहतूक पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. मतदानाच्या दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. मतदान असणाऱ्या ठिकाणी त्या दिवसासाठी रस्त्यात तात्पुरता बदल केला आहे. सर्व मतदारांना मुंबई पोलिसांनी आवाहन केले आहे की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा सहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये ९ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबई पोलिसांकडून आदेश प्रसारीत करण्यात आले आहे. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात कुठलाही अनुचित प्रकार किंवा गोंधळ होणार नाही याची खबरदारी घ्यावी. मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन होईल असे कृत्य करु नये. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी मुंबई पोलीस सज्ज असून काही तक्रार असल्यास लोकांनी मुंबई पोलिसांच्या १००, १०३, ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.