मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 मार्च 2025
मुंबई, – विधानसभेच्या अधिवेशात औरंगजेबविषय आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान करणे सपा आमदार आबू असीम आझमी यांना चांगलेच भोवणार आहे. त्यांच्याविरुद्ध नौपाडासह मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. यापूर्वीही आबू आझमी यांनी अनेक आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले होते, त्यात आणखीन एका विधानाची भर पडली आहे.
किरण विष्णू नाकती हे लेखक-दिग्दर्शक असून ते ठाण्यातील नौपाडा परिसरात राहतात. ते समाजसेवक असून शिवसेना पक्षाचे काम करतात. नौपाडा विभागातील ते शिवसेनेचे विभागप्रमुख म्हणून काम करतात. सोमवारी सायंकाळी त्यांना प्रसारमाध्यमावर आबू आझमी यांची एक मुलाखत दिसली होती. त्यात आबू आझमी हे औरंगाजेबाच्या राज्यकारभावर स्तुतीसुमने उधळत होते. त्यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक असल्याचे बोलून त्याच्या काळात भारताला सोने की चिडीया असे बोलले जात होते. त्यावेळेस भारताचा जीडीपी 24 टक्के होता. त्यामुळे भारतात इंग्रज आले होते.
औरंगजेबाने हिंदुच्या देशात हिंदुच्या देवाचे दर्शन घेण्यासाठी कर लावून हिंदूची लूट केली. अशा लुटारु औरंगजेबाला आबू आझमी हे उत्तम प्रशासक म्हणत होते. भारतातील सत्ताधारी पक्षाविषयी काही लोक आपल्या देशात मुस्लिम समाजाला तबाह करत आहेत असे बोलून हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक औरंगजेबने हिंदुची मंदिरे तोडली. गरीबांवर अन्याय केला. देव, देश आणि धर्मांसाठी छत्रपती संभाजी महाराजाचे बलिदान कोणीही विसरु शकत नाही. औरंगजेबनेच छत्रपती संभाजी महाराजाचे 40 दिवस हाल केले. त्यांना धर्म परिवर्तनासाठी जुलूम जबदस्तीने केली. रयतेवर अगणित अन्याय, देव धर्मांची विटंबना करणार्या औरंगजेबचा कारभार भारतीय इतिहासातील काळा अध्याय होता.
असे असताना सपा आमदार आबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती करताना किरण नाकती यांनी मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आबू आझमी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत आबू आझमी यांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.