न्यूयॉर्कहून आणलेल्या सोने तस्करीचा पर्दाफाश

1.41 कोटीच्या सोन्यासह दोघांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जून 2025
मुंबई, – न्यूयॉर्कहून आणलेल्या सोने तस्करीचा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका स्क्रू कर्मचार्‍यासह सोने तस्करीच्या सिंडीकेटच्या मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे. राकेश सोहनलाल राठोड गिरीश रावजी पिंपळे अशी या दोघांची नावे आहेत. या कारवाईत या अधिकार्‍यांनी 1 किलो 373 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले असून त्याची किंमत 1 कोटी 41 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. अटकेनंतर या दोघांनाही शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सोने तस्करी करणारी एक आंतरराष्ट्रीय टोळी असून या टोळीचा राकेश राठोड हा म्होरक्या असून त्याच्यासाठी गिरीश हा काम करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

दादर येथे गिरीश पिंपळे हा राहत असून तो विमानळावरील क्रू कर्मचारी आहे. शुक्रवारी न्यूयॉर्कहून एअर इंडियाचे एक विमान छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. याच विमानातून गिरीश हा आला होता. ग्रीन चॅनेलवर विमानतळावर जाताना त्याला डीआरआयच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या सामानाची झडती घेतलनंतर त्यात पोलिसांना एक पावती सापडली होती. त्यात त्याने काही न्यूयॉर्कमध्ये काही सोने खरेदी केल्याचे नमूद केले होते. याबाबत त्याची चौकशी केली असता त्याने न्यूयॉर्कहून सोने आणल्याची कबुली देताना ते सोने बॅगेज सर्व्हिस एरियाच्या एका सोफ्यामध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर या अधिकार्‍यांनी तेथून 1 किलो 373 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले. त्याची किंमत 1 कोटी 41 लाख रुपये इतकी आहेत.

तपासात सोने तस्करी करणारी एक आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचे उघडकीस आले. या टोळीचा म्होरक्या राकेश राठोड असून त्याच्या सांगण्यावरुन गिरीश हा सोने तस्करी करत होता. एक किलो सोन्यामागे त्याला दोन लाख रुपयांचे कमिशन मिळत होते. यापूर्वी त्याने न्यूयॉर्कहून दोन वेळा सोने आणल्याची कबुली दिली. न्यूयॉर्कला गेल्यानंतर गिरीशला राकेशचे सहकारी विदेशी चलन देत होते, त्यानंतर तो सोने विकत घेऊन मुंबईत आणून राकेशला आणून देत होता. तपासात ही माहिती उघडकीस येताच या पथकाने राकेश राठोडला अटक केली. सोने तस्करीच्या गुन्ह्यांत अटक केल्यांनतर या दोघांनाही शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page