दार्जिलिंगच्या 27 वर्षांच्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणीच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 नोव्हेंबर 2025
मुंबई, – मूळची दार्जिलिंगची रहिवाशी असलेल्या एका 27 वर्षांच्या तरुणीने तिच्या कामाच्या ठिकाणी मंगळवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे तिच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. याप्रकरणी अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. तिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून या मोबाईलवरुन ती कोणाच्या संपर्कात होती, त्यांची पोलिसांकडून जबानी नोंदवून आत्महत्येमागील कारणाचा शोध घेत आहेत.

27 वर्षांची ही तरुणी मूळची दार्जिलिंगची रहिवाशी आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती अ‍ॅण्टॉप हिल येथील कल्पक नाका परिसरात राहणार्‍या एका वयोवृद्धांच्या घरी कामाला होता. त्यांची केअरटेकरसह घरातील सर्व कामाची तिच्यावर जबाबदारी होती. मंगळवारी सकाळी पावणेआठ वाजता या तरुणीने तिच्या रुममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार नंतर वयोवृद्धांच्या निदर्शनास येताच त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली होती.

ही माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पावडे यांच्यासह अन्य पोलीस पथकाने तिथे धाव घेतली होती. तिला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे तिने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही.

तिच्या आत्महत्येची माहिती तिच्या दार्जिलिंगमध्ये राहणार्‍या कुटुंबियांना देण्यात आली आहे. ही तरुणी कोणाच्या संपर्कात होती, या सर्वांची माहिती काढली जात आहे. ती मानसिक तणावात होती का, तिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या मोबाईलची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page