लाईट बिलाच्या वादातून भावासह तिघांवर प्राणघातक हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपी भावाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – लाईट बिलाच्या वादातून लहान भावावर त्याच्याच भावाने हाताने मारहाण करुन नंतर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. या हल्ल्यात सुशांत वसंत निकाळजे याच्यासह त्याचे चुलत मावस मेहुणे समाधान सरतापे आणि सतीश सरतापे असे तिघेही जखमी झाले आहे. या तिघांवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी भाऊ सिद्धार्थ वसंत निकाळजे याला टिळकनगर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना रविवारी 15 ऑक्टोंबरला दुपारी पावणेचार वाजता चेंबूर येथील पी. एल लोखंडे मार्ग, मुकूंदनगर गेटजवळ घडली. याच परिसरातील सम्राट अशोक चाळीत सुशांत निकाळजे हे राहतात. सिद्धार्थ हा त्यांचा मोठा भाऊ असून तो चालक म्हणून काम करतो. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरातील आर्थिक गोष्टींवर वाद सुरु होता. त्यातच रविवारी दुपारी त्यांच्या घरातील लाईट बिलावरुन प्रचंड वाद झाला होता. यावेळी सुशांतच्या पत्नीचा मावस भाऊ समाधान सरतापे याने सिद्धार्थला लाईट बिलाची अर्धी रक्कम तो भरतो, मात्र तुम्ही भांडण करु नका असे सांगितले.
यावेळी सिद्धार्थने त्याला आमच्या भांडणात पडू नकोस असे सांगून त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुशांतसह समाधान आणि सतीश सरतापे यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला होता. याच रागाने सिद्धार्थ सुशांत यांना हाताने बेदम मारहान घरातील चाकूने तुम्हाला जिवंत सोडत नाही असे सांगून त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यात सुशांतच्या डाव्या हाताला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी समाधान आणि सतीशने त्याला अडविण्यचा प्रयत्न केला होता. त्याने त्याच चाकूने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात समाधानच्या हाताला, अंगठ्याला आणि सतीशच्या डाव्या हाताला व छातीला दुखापत झाली होती.
हल्ल्यात तिघेही जखमी झाल्याने त्यांना स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या राजाावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. हॉस्पिटलमधून ही माहिती प्राप्त टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सुशांतच्या जबानीवरुन पोलिसांनी त्याचाच भाऊ सिद्धार्थ निकाळजे याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सिद्धार्थला पोलिसांनी अटक केली. सिद्धार्थविरुद्ध टिळकनगर पोलीस इाण्यात 2012 साली एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यानंतर त्याच्यावर झालेला हा दुसरा गुन्हा आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.