वयोवृद्धांना टार्गेट करुन लुटमार करणार्‍या दुकलीस अटक

दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार; इतर गुन्ह्यांची उकल होणार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – बोलबच्चन देऊन रस्त्यावरुन जाणार्‍या वयोवृद्धांना विशेषता महिलांचे सोन्याचे दागिने चोरी करुन पळून जाणार्‍या एका दुकलीस दहिसर पोलिसांनी अटक केली. जलालुद्दीन लोहरी शाह आणि नूरहसन रोशनदिन शाह अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

स्मिता विचंल मुजुमदार ही ६३ वर्षांची वयोवृद्ध महिला दहिसर येथे राहत असून तिचे पती खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. २९ ऑगस्टला ती घरगुती सामान घेण्यासाठी मार्केटमध्ये गेली होती. सामान खरेदी करुन ती घरी जात होती. दुपारी बारा वाजता ती आनंदनगर, गोकुळ सोसायटीजवळून जात होती. याच दरम्यान तिथे एक अज्ञात व्यक्ती आला. त्याने त्याच्या पायाची नस दुखत असल्याचे सांगून जवळपास कुठे हॉस्पिटल आहे का याबाबत विचारणा केली.

काही वेळानंतर तिथे अन्य एक व्यक्ती आलाा आणि त्यानेही त्याच्या पायाची नस दुखत असल्याचे सांगून तिच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर तिच्याशी बोलबच्चन करुन त्यांनी तिला तिच्या विवहिीत मुलीच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले. तिच्या घरी कौटुंबिक समय्या असून त्याने तिला पाचशे रुपये देण्यास सांगून ७१ पावले चालण्यास सांगितले. त्यामुळे पाचशे रुपये देऊन ती ७१ पावले चालत गेली. त्यानंतर त्याने तिला पाचशे रुपये परत केले. त्यानंतर त्यांनी तिला तिच्या हातातील बांगड्या काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. त्यामुळे तिने बांगड्या पिशवीत ठेवल्या. त्यानंतर त्यांनी तिला पुन्हा ७१ पावले चालण्यास सांगितले.

याच दरम्यान ते दोघेही तिचे सव्वादोन लाखांचे सोन्याचे बांगड्या घेऊन पळून गेले. हा प्रकार तिच्या लक्षात येताच तिने दहिसर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना परिसरातील सीसीटिव्ही आणि तांत्रिक माहितीवरुन जलालुद्दीन शाह आणि नूरहसन शाह या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर अटकेची कारवाई करुन त्यांना बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अशाच इतर काही गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page