७३ लाखाच्या फसवणुकीप्रकरणी मुख्य आरोपीसह दोघांना अटक
बांगड्या बनविण्यासाठी दिलेल्या शुद्ध सोन्याचा अपहाराचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सुमारे ७३ लाखांच्या अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका मुख्य आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक केली. साकीरअली हबीबी मंडल आणि साबीरअली मोन्डल ऊर्फ बप्पी अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या गुन्ह्यांत या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. साबीरअलीवर सोन्याच्या बांगड्या बनविण्यासाठी दिलेल्या अर्धा किलो वजनाच्या शुद्ध सोन्याचा अपहार केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या साबीरअलीसह त्याचा सहकारी साकिरअलीला पोलिसांनी गजाआड केले.
नितेशकुमार रमेशचंद्र मेहता हे मालाड येथे एका ज्चेलर्स शॉपमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांचे वडिल रमेशचंद्र मेहता हे ज्वेलर्स व्यापारी सून त्यांया मालकीचे झव्हेरी बाजार येथे रमेश ज्वेलर्स नावाचे एका शॉप आहे. या शॉपमध्ये ते वेगवेगळ्या ज्वेलर्स व्यापार्यांना सोन्याचे दागिने बनवून विक्रीचे काम करतात. तिथेच ते मॅनेजर म्हणून काम करत असून त्यांच्यावर संपूर्ण शॉपची जबाबदारी आहे. त्यांचा कांदिवलीतील आकुर्ली रोड, आकुली इंडस्ट्रिज इस्टेटमध्ये सोन्याच्या बांगड्या बनविण्याचा कारखाना असून या कारखान्यात त्यांचा भाऊ निलेश हा मॅनेजर म्हणून काम करतो. गेल्या दोन वर्षांपासून ते साबीरअलीच्या परिचित असून त्याच्या मालकीचे दहिसर येथे एसएएम गोल्ड नावाचे सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे.
अनेकदा ते त्यांच्या शॉपचे दागिने त्याच्याकडे बनविण्यासाठी देत होते. त्याने वेळेवर दागिने बनवून त्यांचा विश्वास संपादन केला होता. जून महिन्यांत त्यांनी त्याला ७३ लाखांचे अर्धा किलो सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. जुलै महिन्यांत त्याने सर्व दागिने बनवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ऑगस्ट महिना उलटूनही त्याने दागिने बनवून दिले होते. त्यामुळे नितेशकुमार स्वत त्याच्या कारखान्यात गेले होते. यावेळी तिथे साबीरअली नव्हता. त्याच्या कर्मचार्याकडे विचारणा केल्यानंतर तिथे काही दिवसांपासून काम सुरु नसल्याचे समजले. त्यांनी साबीरअलीला संपर्क साधला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता.
तो तिजोरीतील सर्व दागिने घेऊन निघून गेला होता आणि परत कारखान्यात आला नव्हता. दागिने बनविण्यासाठी दिलेल्या ७३ लाखांचा सोन्याचा साबीरअलीने अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी दहिसर पोलिसांत साबीरअलीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या साबीअलीचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना अवघ्या वीस दिवसांत साबीरअली व त्याला गुन्ह्यांत मदत करणारा त्याचा सहकारी साकिरअली मंडल या दोघांना पोलिसांनी अटक केली.
चौकशीत त्यांनी दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर या दोघांनही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत साबीरअली हा मुख्य आरोपी असून त्याने अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.