एकतर्फी प्रेमातून ३६ वर्षांच्या तरुणीचा मानसिक शोषण

३१ वर्षांच्या बेरोजगार आरोपी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ जून २०२६
मुंबई, – एकतर्फी प्रेमातून एका ३६ वर्षांच्या तरुणीचा तिच्याच मित्राने मानिसक शोषण केल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुंदन नावाच्या एका ३१ वर्षांच्या बेरोजगार आरोपी मित्राविरुद्ध गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

तक्रारदार महिला ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत असून सध्या चेंबूर परिसरात तिच्या वयोवृद्ध आई-वडिलांसोबत राहते. तिचे वडिल शासकीय सेवेतून निवृत्त झाले असून तयंना निवृत्ती वेतन मिळते. ती स्वत ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत असून तिचे काम वर्क फ्रॉर्म होम चालते. तिचे इंटाग्रामवर एक अकाऊंट आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत तिची कुंदनशी ओळख झाली होती. तो लोअर परेल येथे राहत असून सध्या काहीच कामंधदा करत नाही. ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री झाली होती. त्यानंतर ते दोघेही एकमेकांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटत होते. या भेटीत तिने त्याला त्यांच्यात फक्त मैत्रीचे नाते असल्याचे सांगितले होते, तरीही तो तिच्यावर हक्क बजावत होता. तिला सतत भेटायला बोलावत होता, तिने नकार दिल्यास तो तिला सतत कॉल आणि मॅसेज करुन मानसिक शोषण करत होता.

३१ डिसेंबरला त्याने तिला अलिबागला जाऊ असे सांगून तिथे एक हॉटेल बुक करु. तो तिच्याशी लग्न करणार असल्याने त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहे असे सांगितले. मात्र तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. कुंदनला चांगला मित्र समजूनही त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केल्याने तिला त्याचा प्रचंड राग आला होता. याच कारणावरुन त्यांच्यात सतत खटके उडू लागले होते. खर्चासाठी पैसे दिले नाही तर तो तिला शिवीगाळ करत होता. अनेकदा व्हिडीओ कॉल करताना त्याने तिचे स्क्रिनशॉट काढले होते. तिचे फोटो तिला न सांगता सोशल मिडीयावर अपलोड करत होता.

त्याचा तिला प्रचंड मानसिक त्रास झाला होता. त्यामुळे तिने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. ती त्याच्या कॉल आणि मॅसेजला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे त्याने तिला त्याच्या जिवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी दिली होती. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी तो तिच्या घरी आला होता. त्याने तिला एक पार्सल दिले होते, त्यात त्याने प्रेमपत्र आणि चॉकलेट ठेवले होते. त्यामुळे तिने एन. एम. जोशी मार्ग पोलिसांत कुंदनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्राची पोलिसांनी गंभीर दखल घेत कुंदनसह त्याच्या आईला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तिथे त्याला पोलिसांनी योग्य ती समज दिली होती. यावेळी त्याने तक्रारदार तरुणीची पोलिसांसमोरच माफी मागून तिला पुन्हा त्रास देणार नाही असे सांगितले होते.

काही दिवसांनी त्याने पुन्हा तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मेलवर तिचे पाठवून तिचा मानसिक शोषण सुरु केला होता. तिचे लग्न ठरले असताना तो तिच्या भावी पतीला मेल करुन शिवीगाळ करत होता. या संपूर्ण घटनेने तिला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते, त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध गोवंडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कुंदनविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page