नशेसाठी आणलेल्या ड्रग्जमिश्रीत कोडेन फॉस्फेटसह तिघांना अटक

आरोपींकडून ५३ लाखांचा ड्रग्जमिश्रीत बाटल्यासह स्कूटी जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ जून २०२६
मुंबई, – नशेसाठी आणलेल्या ड्रग्जमिश्रीत कोडेन फॉस्फेटसह चारजणांच्या एका टोळीला कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अर्सलान अनीस खान, विश्‍वकर्मा लल्लन माली आणि मोहम्मद सोहेल सागीर खान अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अन्य एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून त्याला सोमवारी कांदिवली युनिटला हजर राहण्याचे समजपत्र देऊन त्याच्या पालकाकडे सोपविण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६८ हजार ३०० रुपयांचे कोडेन फॉस्फेटमिश्रीत १५३ सिलबंद बाटल्या, ५० लाख ३९ हजार १०० रुपयांचे कोडेन फॉस्फेट ड्रग्जमिश्रीत ४५८१ बाटल्या आणि एक लाख रुपयांची सुझुकी स्कूटी असा ५३ लाख ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शनिवारी दुपारी गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटचे काही अधिकारी आणि कर्मचारी परिसरात गस्त घालत होते. दुपारी एक वाजता मालाड येथील एस. व्ही रोड, इंडियन ऑईलसमोरील रजियादेवी गजानंद गुप्ता जल तृप्ती केंद्राजवळ गस्त घालताना या पथकाला चारजण संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले. त्यापैकी दोन व्यक्तींच्या हातात पिशव्या तर एका व्यक्तीकडे पुठ्याचा बॉक्स होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील पिशवी आणि बॉक्स उघडून तपासणी केल्यानंतर त्यात ड्रग्जमिश्रीत कोडेन फॉस्फेटच्या बाटल्या सापडल्या.

या चौघांनाही ताब्यात घेतल्यानंतर कांदिवली युनिट कार्यालयात आणण्यात आले. चौकशीत ते चौघेही मालाड परिसरात नशेसाठी संबंधित ड्रग्जमिश्रीत कोडेने फॉस्फेड विक्रीसाठी आले होते, मात्र डिलीव्हरी करण्यापूर्वी या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी ड्रग्जमिश्रीत कोडेने फॉस्टेडच्या बाटल्यासह एक स्कूटी जप्त केली आहे. एका आरोपीने नवी मुंबईतील खारघर परिसरात एक गोदाम घेतले असून या गोदामात अन्य ड्रग्जमिश्रीत बाटल्या ठेवल्याची कबुली दिली होती. त्यानंतर या पथकाने तिथे छापा टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्जमिश्रीत कोडेने फॉस्फेडचा साठा जप्त केला. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ५३ लाख रुपये इतका आहे.

ताब्यात घेतलेला एकजण सतरा वर्षांचा अल्पवयीन मुलगा असल्याचे उघडकीस आले. त्याला नंतर त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. या चारही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच अर्सलान खान, विश्‍वकर्मा माली आणि मोहम्मद सोहेल खान या तिघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपीचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश माळी, पोलीस निरीक्षक रघुनाथ पाटील, बाबासाहेब काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलोफर शेख, दादासाहेब बनसोडे, अमीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, सहाय्यक फौजदार गवस, नावगे, सुर्वे, पोलीस हवालदार गोवळकर, कांबळे, निजाई, खताते, जाधव, चव्हाण, महिला पोलीस हवालदार लाडे, खांडेकर, पोलीस शिपाई वरठा, मैर्‍या, सानप, महिला पोलीस शिपाई जाधव यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page