कर्जाच्या आमिषाने अनेकांची 82 लाखांची फसवणुक

पंतसंस्थेच्या संचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मे 2026
मुंबई, – कर्जाच्या आमिषाने अनेकांची सुमारे 82 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी पंतसंस्थेच्या दोन संचालकासह तिघांविरुद्ध पंतनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुक तसेच अन्य भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रविण शिंदे, असद शेख ऊर्फ मोहम्मद रफिक सय्यद आणि हिरेन मेहता ऊर्फ राठोड अशी या तिघांची नावे आहेत. यातील प्रविण शिदें व असद शेख हे साई जागृती नागरी पंतसंस्थेचे संचालक तर हिरेन मेहता शाखा व्यवस्थापक असून या तिघांनी आतापर्यंत तक्रारदारासह दहाजणांची सुमारे 82 लाखांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

प्रकाश नारायण नायक हे 62 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार कल्याणच्या खडकपाडा परिसरातील रहिवाशी असून सिव्हील कॉन्ट्रक्टर आहेत. त्यांची एन. व्ही डेव्हलपर्स नावाची एक कंपनी असून ही कंपनी कल्याण परिसरात इमारत दुरुस्तीसह बांधकाम करते. त्यांना त्यांच्या व्यवसाय वाढीसह कल्याणच्या बाप गाव या नवीन बांधकाम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्जाची गरज होती. याच दरम्यान त्यांच्या एका मित्राने त्यांना घाटकोपर येथील हनुमान मंदिरासमोरील रायगड चौकात असलेल्या साई जागृती नागरी पंतसंस्थेची माहिती देताना तिथे त्यांना कर्ज मिळेल असे सांगितले. त्यामुळे कर्जाविषयी विचारणा करण्यासाठी ते तिथे गेले होते. तिथे त्यांचची पंतसंस्थेचे संचालक प्रवणि शिंदे आणि असद शेख यांच्याशी ओळख झाली.

या दोघांनी त्यांना दोन कोटीचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी त्यांना त्यांच्या पतसंस्थेत पंतसस्थेत चालू खाते उघडण्यास भाग पाडले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी चालू खाते ओपन करण्याासठी 11 लाख 18 हजार 800 रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी दोन कोटीचे कर्ज मिळवून दिले नाही. चौकशीदरम्यान या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांना कर्ज देतो असे सांगून त्यांच्याकडून खाते उघडण्यासाठी पैसे घेतले होते, मात्र त्यापैकी कोणालाही कर्ज मिळवून दिले नाही.

त्यापैकी प्रसाद साहेबराव शेलार यांच्याकडून साडेचौदा लाख, भालचंद्र केशव येशिकर यांच्याकडून दोन लाख, राजेंद्र दत्तात्रय पिंगळे यांच्याकडून दहा लाख पाच हजार, आरती काशिनाथ रुपवते हिच्याकडून साडेतीन लाख, अनिल काशिनाथ सोनावणे यांच्याकडून साडेचोदा लाख, विद्या प्रकाश अजिलवाड साडेपाच लाख, कामिशनी मोतीराम देशमुख तीन लाख, पुष्पा रोहितदास कटके तीन लाख, कल्पना विजय राजगुरु साडेतीन लाख तर किरण गजानन कारखानीस यांच्याकडून अकरा लाख सोळा हजार चारशे रुपये असे 70 लाख 71 हजार 400 रुपये घेतले होते.

अशा प्रकारे एकूण अकराजणांकडून त्यांनी सुमारे 82 लाख रुपये घेऊन या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी पंतनगर पोलिसांत प्रविण शिंदेसह इतर दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पंतसंस्थेचे संचालक प्रविण शिंदे, असद शेख आणि शाखा व्यवस्थापक हिरेन मेहता या तिघांविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page