सतरा वर्षांच्या मुलावर पित्याकडून अनैसगिंक लैगिंक अत्याचार
माहीम येथील घटना; आरोपी पित्याला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जुलै २०२४
मुंबई, – सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर त्याच्या पित्याने अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना माहीम परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी याप्रकरणी अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला माहीम पोलिसांी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
सतरा वर्षांचा पिडीत मुलगा हा माहीम परिसरात राहत असून तो सध्या शिक्षण घेत आहे. आरोपी त्याचे वडिल असून संबंधित कुटुंबिय तिथे भाड्याच्या रुममध्ये राहतात. गेल्या एप्रिल महिन्यांत घरात कोणीही नसताना त्याने त्याचे कपडे काढून त्याच्यावर अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणाला सांगू नकोस अशी धमकी त्याने दिली नाही. बदनामीच्या भीतीने त्याने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. एप्रिल २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत त्याने त्याच्यावर अनैसंगिक लैगिंक केला होता. पित्याकडून सुरु असलेल्या या लैगिंक अत्याचाराला कंटाळून गेला होता. त्यातून काही दिवसांपासून त्याला प्रचंड नैराश्य आले होते. त्यामुळे त्याने पित्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने माहीम पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपी पित्याविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक गोकुळ दगडखैर यांनी मुलाच्या तक्रारीवरुन पित्याविरुद्ध ११५ (२), ३५२, ३५१ (१) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ५ (एल), ५ (एन), ६ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच शनिवारी रात्री उशिरा आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलाची भाभा हॉस्पिटलमध्ये मेडीकल करण्यात आली असून लवकरच आरोपीची मेडीकल होणार आहे.