अडीच वर्षांच्या मुलीचा लैगिंक अत्याचारानंतर मृत्यू

मृत मुलीच्या आईसह 19 वर्षांच्या प्रियकराला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 मे 2025
मुंबई, – लैगिंक अत्याचारादरम्यान एका अडीच वर्षांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या आईसह तिच्या 19 वर्षीय प्रियकराला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध हत्येसह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी प्रियकराने आईसमोरच तिच्या अडीच वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मेडीकल रिपोर्टमध्ये हा प्रकार संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर मालवणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध अटकेची कारवाई केली.

30 वर्षांची महिला ही मालाडच्या मालवणी परिसरात राहते. ती विवाहीत असून तीन वर्षांपूर्वी तिचा पती तिला सोडून निघून गेला होता. तेव्हापासून ती तिच्या आईसोबत राहत होती. पती निघून गेल्यानंतर ती गरोदर होती. त्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला होता. सध्या ती मुलगी अडीच वर्षांची होती. याच परिसरात राहणार्‍या एका 19 वर्षांच्या तरुणासोबत तिची मैत्री होती. या मैत्रीचे नंतर प्रेमात रुपांतर झाले आणि त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले होते. रविवारी रात्री तो तिच्या घरी आला होता. यावेळी त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. त्याने तिच्या आईसमोरच तिच्या मुलीशी लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.

लैगिंक अत्याचारादरम्यान ही मुलगी वेदनेने तडफडत होती, त्यात तिचा मृत्यू झाला होता. या प्रकारानंतर तिच्या आईला तिला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे तिने तिची मुलगी आजारी होती, त्यात तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र मुलीच्या गुप्त भागांवर काही जखमा असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्यात तिच्यावर लैगिंक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले होते. हा रिपोर्ट प्राप्त होताच हॉस्पिटल प्रशासनाकडून ही माहिती मालवणी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या आईसह प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीदरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी हत्येसह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेने मालवणी परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page