कोट्यवधी रुपयांच्या ऑनलाईन सट्टेबाजी घोटाळ्यातील आरोपीस अटक
म्युल अकाऊंट नेटवर्कशी संबंधाची ईडीकडून चौकशी सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – ऑल पॅनल एक्स्चेंज फसवणूक, सट्टेबाजी आणि सायबर फसवणूक प्रकरणी अमली बजावणी संचनालयाने सागर डॅशला बेड्या ठोकल्या. सागर हा फसवणूक प्रकरणातील आरोपी समुद्र सिंग राठोडचा साथीदार आहे.
१ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – ऑल पॅनल एक्स्चेंज फसवणूक, सट्टेबाजी आणि सायबर फसवणूक प्रकरणी अमली बजावणी संचनालयाने सागर डॅशला बेड्या ठोकल्या. सागर हा फसवणूक प्रकरणातील आरोपी समुद्र सिंग राठोडचा साथीदार आहे.
अमली बजावणी संचनालय (ईडी) मुंबई युनिट हे ऑल पॅनल एक्स्चेंज द्वारे चालवणाऱ्या ऑनलाईन गेमिंग सट्टेबाजी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणाचा तपास करत आहे. मनी लौंड्रीन्ग प्रतिबंधक कायदा (पीएमएल) कायदा २००२ च्या तरतुदीनुसार ईडी ने २६ ऑक्टोबरला सागर ला अटक केली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष घोलप याने तक्रारी केल्या होत्या. सागर डॅश, समुद्र सिंग राठोड याचे साथीदार याच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयाच्या सट्टेबाजी, सायबर फसवणूक, कॅसिनो गेमिंग आणि ऑनलाईन मटका च्या नेटवर्क बाबत माहिती दिली होती. त्या माहितीवरून ईडी मुंबई युनिटने तपास करून सागर डॅश ला अटक केली. त्याला अटक करून विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची ईडी कोठडी सुनावली आहे.
ऑनलाईन गेमिंग/ बेटिंग आणि सायबर बाबत ईडीने तीन गुन्हे नोंद करून तपास सुरु केला आहे. त्या गुन्ह्यात तक्रारदार याची फसवणूक झाली असून त्याना कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे. फसवणुकीची रक्कम हैद्राबाद येथील एका मर्कंटाईल बँक खात्यात जमा झाली होती. त्यानंतर ती रक्कम विविध शेल कंपन्यांकडे वळवण्यात आली. तसेच एक रक्कम बंगळुरू येथील एका कॉऑपरेटिव्ह सोसायटीच्या खात्यात जमा झाली होती. ते खाते एका एक्सचेंज च्या नावाने उघडण्यात आले होते. ती संस्था सागर ने सुरु केली होती. ईडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समुद्र सिंग राठोड आणि मुकेश जैन हे दोघे मुख्य सूत्रधार आहेत. तर सागर हा साथीदार असून ते हवाला, क्रिप्टो आणि सायबर फसवणुकीशी संबंधित कामे हाताळत होते.
बनावट केवायसीचा वापर
सागर ने बँगलोरच्या क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी केवायसी साठी बनावट कागद पत्राचा वापर केला होता. त्याने बनावट दस्तावेज बनवून क्रिप्टो खाते तयार केले होते. तसेच त्याने सहकारी संस्थेच्या बँक खात्याद्वारे शेकडो कोटी रुपयाची रक्कम वळवली होती. गेमिंग, बेटिंग आणि सायबर फसवणुकीची रक्कम जमा होत होती.
प्रमुख महानगरात छापे सत्र
ईडी ने या गुन्ह्याचा तपासा दरम्यान पुणे, मुंबई, बँगलोर, हैद्राबाद, सुरत गुजरात ( मेहसाणा) येथे छापे टाकले. छापे टाकून काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. तपासा दरम्यान ईडी ने काही बँक खाती गोठवली होती.
* दरोज हजारो कोटीचे मनी लौंड्रीन्ग आणि हवाला व्यवहार
* लाखो रुपयाचे बेकायदेशीर आर्थिक जाळे चालवले जात होते.
* देशभरात कॉल सेंटर आणि कार्यालयाच्या स्वरूपात बेकायदशीर यंत्रणा उभारली.
* दुबईतून नेटवर्क हाताळले जात होते. हे नेटवर्क महादेव ऑनलाईन बुक बेटिंग नेट्वर्कशी संबंधित असल्याचा ईडीला संशय