अभिनेता रणवीर शौरी यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी
राज परिहार या व्यक्तीच्या नावाने धमकी आल्याचे तपासात उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – आपल्या दमदार अभिनयाने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका निभावणार्या रणवीर क्रिशनदेव शौरी यांना अज्ञात व्यक्तीने सोशल मिडीयावरुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. धमकी देणार्या व्यक्तीने स्वतचे राज परिहार असल्याचे सांगून त्यांचा लवकरच गेम करणार असल्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी रणवीर शौरी यांच्या तक्रारीवरुन उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुर केला आहे. धमकी देणारा व्यक्ती त्यांच्याच परिचित असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
रणवीर शौरी हे अंधेरीतील यारी रोड-वर्सोवा, पंचमार्ग, पोसायडॉन अपार्टमेंटमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते बॉलीवूडमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम करतात. त्यांनी आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात काम केले असून त्यातील काही चित्राटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. ते सोशल मिडीयावर सक्रिय असून त्यांचे इंटाग्राम, व्हॉटअपसह इतर सोशल मिडीयावर अकाऊंट आहेत. या अकाऊंटवरुन ते त्यांच्या कुटुंबियासह नातेवाईक आणि फॅनला फॉलो करुन त्यांचा पोस्टवर त्यांचे मत व्यक्त करतात. १२ ऑक्टोंबरला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना त्यांच्या वैयक्तिक जीमेलवर एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज केला होता.
या व्यक्तीने स्वतचे नाव राज परिहार सांगून मॅसेजमध्ये अश्लील भाषैचा वापर करुन त्याचे आयुष्य संपविण्याची धमकी दिली होती. पुढच्या वर्षी तु सार्वजनिक ठिकाणी दिसलास की आमचे चार ते पाच जण तिथे पोहचतीलख मागून डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करतील. तिथेच तुझा गेम खल्लास होईल. एका फटक्यात तुझी कवटी दोन तुकड्यांना विभागली जाईल. तु कुठे असतोस आणि कसा हालचाल करतोस याची आम्हाला माहिती आहे. हीच आमची जमेची बाजू आहे. योग्य वेळेस आम्ही हल्ला करु. तु आमच्या वॉच लिस्टमध्ये आहे असा मजकूर दिला होता.
काही वेळानंतर त्याला अशाच प्रकारे दुसरा मॅसेज पाठविण्यात आला होता. त्यातही त्याला अश्लील शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर त्याने स्थानिक पोलिसांसह उत्तर प्रादेशिक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी राज परिहार नावाच्या व्यक्तीविरुद्ध शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे. प्राथमिक तपासात त्यांना दोन वेगवेगळ्या मेलवरुन ही धमकी आली आहे. आरोपी हा त्यांच्या परिचित असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.