फ्लॅटमध्ये ड्रग्ज सप्लायर करणारा ३५ वर्षांच्या आरोपीस अटक

कारवाईत २ कोटी ३९ लाखांचे विविध ड्रग्जचा साठा हस्तगत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – उत्तर मुंबईतील मालाड येथील निवासी फ्लॅटमध्ये ड्रग्ज सप्लायर करणार्‍या एका ३५ वर्षांच्या आरोपीस कांदिवली युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सौद शब्बीर अहमद चौगुले असे या आरोपीचे नाव असून या कारवाईत पोलिसांनी विविध ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या ड्रग्जची किंमत २ कोटी ३९ लाख रुपये आहे. सौदविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई शहरात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना सौद नावाच्या एका ड्रग्ज तस्कर त्याच्या स्वतच्या घरातून विविध ड्रग्जचा सप्लायर करत असल्याची माहिती पोलीस शिपाई रोकडे यांना मिळाली होती. सौद हा मालाड येथील लिंक रोड, रामचंद्र लेन, मालाड-शिवशक्ती एसआरए गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहत होता. वरिष्ठांना ही माहिती सांगताच त्यांनी कांदिवली युनिटला आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे, पोलीस हवालदार हनुमंत राणे, मोहिते, पोलीस शिपाई रोकडे व अन्य पोलीस पथकाने १४ ऑक्टोंबरला रात्री उशिरा सौदच्या मालाड येथील घरी छापा टाकला होता.

या कारवाईत पोलिसांनी १ कोटी ८ लाख रुपयांचा १०२७ किलो हायड्रोपोनिक गांजा, ७२ लाखांचा ७२० ग्रॅम वजनाचा चरस, २५ लाखांचा २५ ग्रॅम वजनाचे कोकेन, ७ लाख २० हजाराचा ७२ एलएसडी डॉट पेपर आणि २७ लाख ४० हजार रुपयांचे हशीश तेल असा २ कोटी ३९ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मुद्देमालासह सौदला नंतर कांदिवली युनिट कार्यालयात आणण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याला ते ड्रग्ज कोणी दिले, तो कोणाला ड्रग्जची विक्री करत होता. या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page