मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 जानेवारी 2026
मुंबई, – कुटुंबिय उत्तरप्रदेशात गेल्याची संधी साधून एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने लैगिंक अत्याचार केल्याची घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रवी नावाच्या आरोपी मित्राविरुद्ध साकिनाका पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पिडीत मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पिडीत मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत साकिनाका परिसरात राहत असून सध्या ती कॉलेजमध्ये शिकते. तिचा रवी हा मित्र असून तोदेखील साकिनाका परिसरात राहतो. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत रवीचे कुटुंबिय त्याच्या उत्तरप्रदेशातील गावी गेले होते. यावेळी त्याच्या घरी कोणीही नव्हते. ही संधी साधून 1 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत त्याने पिडीत अल्पवयीन मैत्रिणीला त्याच्या घरी आणले होते.
घरी आल्यानंतर त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार तिने कोणाला सांगू नये म्हणून त्याने तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. अलीकडेच या मुलीला पोटात वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे ती गरोदर असल्याचे उघडकीस आले होते. ही माहिती प्राप्त होताच साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी पिडीत मुलीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिचा मित्र रवी याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आरोपी पळून गेल्याने त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान पिडीत मुलीला उपचारासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.