मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ सप्टेंबर २०२५
मुंबई, – कोट्यवधी डॉलर्सच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी फरार व्यावसायिक नीरव मोदींचा साथीदार संदीप मिस्त्रीला अखेर संयुक्त अरब अमिराती (युएई) येथून प्रत्यार्पणाद्वारे सीबीआयने अटक केली. त्याला विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला न्यायालयाने ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. २०२५ मध्ये न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटच्या प्रकरणात ही अटक आहे.

मिस्त्री याने नीरव मोदीच्या हाँगकाँग येथील फॅन्सी क्रिएशन लिमिटेडमध्ये संचालक म्हणून काम केले होते असे सीबीआयचे म्हणणे आहे. तसेच मिस्त्रीने मोदी आणि इतर काही आरोपीसोबत मिळून गुन्हेगारी कटात भूमिका बजावली. पंजाब नॅशनल बँकेची एकूण ६४९८.२० कोटी रुपयाची फसवणूक करण्यात आली. मिस्त्री आणि मोदीचा भाऊ निहाल हे दुबई मधील काही डमी संचालकांना देश सोडून जाण्याची धमकी दिली होती असा आरोप सीबीआयने केला आहे. धमकी देऊन कैरो येथे स्थंलांतरित होण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.
तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने त्याचे मोबाईल फोन ही नष्ट केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. विविध कंपन्यांच्या दैनंदिन कारभारावर नियंत्रण ठेवत गुप्त आणि स्वतःहून डिलीट होणाऱ्या कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मचा वापर केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. हिरे, सोने आणि मोती ज्वेलरीच्या कथित बनावट आयात-निर्यात व्यवहारासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात सहभाग असल्याचा त्याच्यावर आहे आहे. तसेच युएइ मधील डमी कंपन्यांच्या बँक खात्यातून निधी वळता केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जुलै २०२६ मध्ये सीबीआयच्या विनंती वरून इंटरपोल मार्फत मिस्त्री विरोधात रेड कॉर्नर नोटीस जरी करण्यात आली होती. रेड कॉर्नर नोटीसनंतर युएइ मध्ये संदीपचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. सोमवारी (ता. २८) रात्री ११. ५५ वाजता मिस्त्रीला मुंबईत आणण्यात आले. मुंबईत आणण्यात आल्यावर त्याला सीबीआयच्या बीएसइबी युनिटच्या अधिकाऱ्याने ताब्यात घेतले. त्याला अटक करून विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले होते.